आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी सर्वोच्च स्थानी पोहोचवणे हा दैनिक भास्करचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये भाषामाला, अखिल भारतीय लेखन स्पर्धा व द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यंदा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये दैनिक भास्करच्या वतीने हिंदी भाषेसाठी अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले. दै. भास्कर भाषा मालाअंतर्गत सत्र घेण्यात आले. युवा प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धा झाली. विजेत्यांना साहित्यातील दिग्गज मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. हिंदीतील नवोदित लेखकांसाठी द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.

भास्कर भाषामाला
दरवर्षी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ‘दै. भास्कर’तर्फे दैनिक भास्कर भाषामालेचे आयोजन केले जात आहे. या वर्षी भास्कर भाषा मालेाअंतर्गत अनेक सत्रे घेण्यात आली. त्यात प्रसिद्ध लेखकांनी विविध विषयांवर त्यांची मते मांडली.

उदयोन्मुख लेखकांना दिले प्रोत्साहन
उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी दैनिक भास्करच्या वतीने यंदा द्वारकाप्रसाद अग्रवाल उदयोन्मुख लेखक पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार तरुण लेखक प्रभात रंजन यांना देण्यात आला. रविवारी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रभात यांना एक लाख रुपये रोख व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

प्रभात यांचे ‘कोठोगाई’ पुस्तक चर्चेत
युवा साहित्यिक प्रभात रंजन यांना २००६चा प्रेमचंद पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘कोठोगाई’ या पुस्तकाला चांगली पसंती मिळत आहे. कोठोगाई २०१५ च्या चर्चेतील पुस्तकांपैकी एक आहे. त्यात मुजफ्फरपूरच्या गायिकांचे अज्ञात किस्से आहेत. प्रभात यांनी या पुस्तकात १०० वर्षे जुन्या नाच-गाण्याच्या परंपरेशी संबंधित सात किस्से सात सुरांप्रमाणे सजवले.

विजेत्यांनी घेतली जगातील प्रसिद्ध साहित्यिकांची भेट
दैनिक भास्करतर्फे अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या वर्षीच्या स्पर्धेच्या विजेत्या देवप्रभा जोशी आणि सुममय अली यांना जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमधील जगातील श्रेष्ठ साहित्यिकांना भेटण्याची संधी मिळाली.