आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात वाहिलेल्या फुलांपासून तयार रंगाची जोरदार विक्री, पैशाचे वाटप मुलांमध्येच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - गेल्या  ५ वर्षांपासून फुलांपासून होळीसाठी रंग तयार करणाऱ्या इबादत विशेष शाळेतील मुलांची यावर्षीही रंग तयार करण्याचे काम प्रारंभ झाले आहे. शाळेतील १८ वर्षे वयावरील दहा बारा मुले आणि कर्मचारी मिळून हा रंग तयार करतात. कोणत्याही प्रकारचे रसायन या रंगात वापरलेले नसते. यामुळे शरीरास अॅलर्जी किंवा अपाय हाेण्याची शक्यता नसते. रंगाचा चाहता वर्ग या त्यांच्या मेहनतीचा मान ठेवतो आणि हातोहात रंगाची विक्री होते.  
अशी असते प्रक्रिया : शाळेच्या व्यवस्थापनाकडून देवाच्या चरणी वाहण्यात येणारी  फुले वर्षभरात सगळ्या मंदिरातून गोळा करतात. त्यातील पिवळ्या, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुले वेगळी करून ती उन्हात वाळवली जातात. होळीच्या एक महिना आधी या फुलांना पुन्हा तीन ते चार वेळा उन्हात वाळवण्यात येते. या फुलांचे कांडप करून त्याची पावडर तयार करण्यात येते. गुलाबाच्या फुलांपासून गुलाबी, झेंडूच्या फुलापासून पिवळा आणि पांढऱ्या फुलापासून तपकिरी लाल रंग तयार केला जातो. यासाठी या फुलाच्या पावडरमध्ये मेंदी मिसळली जाते.  
 
पैशाचे वाटप मुलांमध्येच  
मुले सर्व रंगाची ५० ग्रॅमची पावडर एका पाकिटात बंद करतात. एक पाकीट बाजारात ५० ते ६० रुपयांस विकले जाते. रंगाची विक्री करण्यासाठी शाळेकडूनच स्थानाची निश्चिती होते. तेथे रंग खरेदीसाठी खूप गर्दी उसळते. शाळा, महाविद्यालये, सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्था किंवा नैसर्गिक रंगाची आवड असणारे लोक अशा प्रकारचे रंग मुलांकडून विकत घेतात. शाळेचे अध्यक्ष मोहित कपूर आणि प्राचार्य शिल्पी गांगुली यांनी सांगितले : या प्रकल्पापासून मुलांमध्ये ऊर्जा संचारते. त्यांना स्वयंपूर्ण हाेण्याचे प्रशिक्षण आहे. गेल्यावर्षी होळीच्या दिवशी मुलांनी १५०० पाकिटे बनवली होती, त्यातून मिळालेल्या पैशाचे वाटप त्यांच्यातच केले जाते.
 
बातम्या आणखी आहेत...