आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना पक्ष्यांची ओळख व्हावी म्हणून सुरतमध्ये भरतोय पक्ष्यांचा वर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - या सुंदर पक्ष्याचे नाव आहे मकाऊ. जर त्याला चांगले प्रशिक्षण दिले तर तो लहान सायकल चालवू शकतो. फुटबॉल खेळू शकतो, थोडे नखरेही करतो, या गोष्टी लहान मुलांना सुरतमधील हीरानगरीमध्ये  “पक्ष्यांच्या वर्गात’ शिकवल्या जात आहेत.  या वर्गातून प्राणी आणि पक्ष्यांची लहान मुलांना ओळख व्हावी, असा उद्देश आहे. हा वर्ग चालवणाऱ्यांचे नाव आहे - विशाल पटेल. ते स्वत: ८०० पक्ष्यांसोबत राहतात. वरियाव येथील विशाल पटेलच्या फॉर्म हाऊस हे त्यांचे निवासाचे ठिकाण आहे.  

शाळकरी मुलांशी संवाद   
विशालने मुलांना पक्ष्यांची माहिती देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. १० शाळांतील मुले पक्ष्यांची ओळख व्हावी म्हणून मित्रांची वाडी (मित्रांचा बगिचा)  येथे मुले जाऊन आलेली आहेत.
 
या विषयी विशाल पटेल सांगतात : मुलांना पोपट कसा असतो असे विचारले तर बगळ्यांकडे पाहतात. आफ्रिकन ग्रे-पॅरेट, ब्ल्यू अँड रेड मकाऊ प्रसिद्ध  अॅमेझॉन क्यूबनचा रंग हिरवा आणि गळ्यापर्यंत विविध रंग असतात. याचे लांब गोल डोळे याची वैशिष्ट्ये आहेत. मूळत: आफ्रिकन, अमेरिकन मकाऊचा इक्झॉटिक बर्ड‌्सच्या यादीत पहिला क्रमांक लागतो. रंगीत डोळे व गमतीशीर स्वभावामुळे तो लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...