आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यावरील आयकरची कारवाई 72 तास चालली, कोणताही नियम तोडला नाही : डी.के. शिवकुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक विधानसभा परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर  गुजरात काँग्रेसचे ४४ आमदार आणि कर्नाटकचे शिवकुमार. - Divya Marathi
कर्नाटक विधानसभा परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गुजरात काँग्रेसचे ४४ आमदार आणि कर्नाटकचे शिवकुमार.
बंगळुरू - कर्नाटकचे काँग्रेसचे ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशी संबंधित ६६ मालमत्तांवर सुरू असलेली अायकर विभागाची कारवाई शनिवारी सकाळी संपली. बुधवारी सुरू झालेले छापे ७२ तास चालले. आयकर विभागाने १५ कोटी रुपये राख आणि दागिने जप्त केले आहेत.
 
तीन दिवसांपर्यंत चौकशी केल्यानंतर आयकर अधिकाऱ्यांनी शिवकुमार यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. शिवकुमार कारवाईबद्दल म्हणाले, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. सत्य समोर येईल. माझ्यामुळे पक्षाला लाजिरवाणे वाटू नये, असे मला वाटते. शिवकुमार यांनी स्वत:शी संबंधित मालमत्तेच्या चौकशी बद्दल मात्र पत्रकारांना काहीही माहिती दिली नाही. छाप्यानंतर शिवकुमार पहिल्यांदा मंदिरात गेले आणि नंतर रिसोर्टमध्ये गुजरातच्या आमदारांना भेटायला गेले.
 
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसने गुजरातच्या आपल्या ४२ आमदारांना बंगळुरुच्या एका रिसोर्टमध्ये ठेवले होते. हे रिसोर्ट शिवकुमार यांचे आहे. आयकर विभागाने बुधवारी सकाळी वेगवेगळ्या शहरांत शिवकुमार यांच्याशी संबंधित विविध मालमत्तेवर छापे टाकले. छाप्यांच्या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले होते. कारवाई मागे राजकारण असल्याचा काँग्रेसने आरोप केला.
 
काँग्रेसचे आमदार एक आठवड्यानंतर रिसॉर्टबाहेर
बंगळुरूच्या इगलटन रिसोर्टमध्ये गुजरात काँग्रेसचे ४२ आमदार गेली आठ दिवस मुक्कामी होती. शनिवारी ते पहिल्यांदाच बाहेर पडले. त्यांनी राजभवनात कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. तेथून आमदार सचिवालयातही गेले. विधानसभेलाही त्यांनी भेट दिली. शिवकुमार यांच्यावरील कारवाईच्या विरोधात विधानसभेजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आमदारांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...