आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकरचे छापे : ‘काँग्रेस आमदारांना धमकावण्यासाठी भाजपकडून केंद्रीय संस्थांचा वापर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भाजप सरकार  सत्तेचा दुरूपयोग करत असून, केंद्रीय संस्थांना हाताशी धरुन गुजरातेत विरोधकांना धमकावत असल्याचा आरोप गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी केला. आयकर, सक्त वसुली संचलनालय आणि सीबीआयकडून  धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बंगळुरूजवळील एका रिसॉर्टमध्ये,  गुजरातच्या ४४ आमदारांच्या निवासांची व्यवस्था केली आहे. या मंत्र्यांच्या मालमत्तेची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे, असे भरतसिंह सोळंकी यांनी सांगितले. विरोधकांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी भाजपकडून  भितीचे वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
 
राज्यसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरुवातीला त्यांनी गुजरातेत काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. या दबावापासून व प्रलोभनापासून दूर राहण्यासाठी आमच्या आमदारांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आयकर विभागाकडून छापे घालण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप भरतसिंह यांनी केला आहे. 
 
अहमद पटेल यांचा विजय निश्चित राज्य व केंद्रातील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. केंद्रातील संस्थाद्वारे या अामदारांना धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल  गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत अाहेत. त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सोळंकी यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याही राज्यसभेच्या उमेदवार असून त्यांच्या विजयाबाबत साशंकता आहे, असा दावा त्यांनी केला.
 
 आमदार बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून  ते राज्यसभेची  निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बलवंतसिंहाचा आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तेही पराभूत होतील. शिवाय स्मृती इराणीच्या पराभवाची चिंता भाजपला सतावत आहे. त्या पराभूत होतील आणि अहमद पटेल यांचा विजय निश्चित असल्याचे साेळंकी म्हणाले. भाजपला मतदानाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या “नोटा’ या पर्यायाची चिंता आहे. 
 
कर्नाटकचे उर्जामंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तांवर छाप्यात सापडले १० कोटी रुपये
आयकर विभागाने कर्नाटकचे उर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर आणि मालमत्तांवर करचुकवेगिरीबद्दल छापे घातले आहेत. या छाप्यात आयकर विभागाने सुमारे १० कोटी रुपये जप्त केले आहेत. ही रक्कम बंगळुरुतील त्यांच्या निवासस्थानातून हस्तगत करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...