आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूप्रमाणे शुगर अॅडिक्ट होत आहेत भारतीय, २०१५ मध्ये ७ कोटी लोक मधुमेही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात साखरमिश्रित सॉफ्ट ड्रिंक्स आणि जंक फूडच्या वाढत्या वापराने दातांच्या समस्या वेगाने वाढत आहेत. एम्समधील सेंटर फॉर डेंटल एज्युकेशन अँड रिसर्चचे (सीडीईआर) प्रमुख डॉ. ओ. पी. खरवंदा यांच्या म्हणण्यानुसार, देशातील ८० ते ९०% लोकसंख्येला हिरड्यांशी संबंधित जिंजवायटिसची समस्या आहे. ६० % लोकांना मध्यम दर्जाचा जिंजवायटिस आहे. ५० % लोकांना दातांशी संबंधित छोट्या-मोठ्या समस्या आहेत.
त्यांनी सांगितले, कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूडमध्ये साखरचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या सेवनाने लोकांमध्ये साखरेची नशा होते. त्यासाठी ते बेचैन होतात. ही नशा तंाखूच्या नशेसमान असते. एम्समध्ये ११ नोव्हेंबरला ‘साखर तंबाखूच्या नशेसमान आहे का,’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होईल. त्यात ब्रिटनचे दोन तज्ज्ञ जगभरात साखरेच्या वापरावर बंदीबाबत चर्चा करतील.
भारतात जगापेक्षा जास्त सॉफ्ट ड्रिंक्सची मागणी
३.८ % च्या दराने वाढली २०१५ मध्ये सॉफ्ट ड्रिंक्सची मागणी जगात, भारतात १८% च्या दारने वाढ.
१० हजार लोकांचा मृत्यू साखरमिश्रित पेयांमुळे होतात भारतातही दरवर्षी.
१.८४ लाख लोकांचा मृत्यू होतो सॉफ्ट ड्रिंक्समधील साखरेने जगभरात. त्यापैकी १.३३ लाख लोक मधुमेहाचे बळी ठरतात.
२४ हजार मृत्यू सर्वाधिक मेक्सिकोत. त्यानंतर अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझीलचा क्रमांक.
२१ लाख मधुमेही दर वर्षी
२०१५ मध्ये ७ कोटी लोक मधुमेही.दरवर्षी
२१ लाखांनी वाढ.
८.२ % पुरुष आणि ६.८ % महिला मधुमेहग्रस्त.
२०३० पर्यंत १० कोटी लोक होऊ शकतात ग्रस्त.
तंबाखूमुळे दरवर्षी ११ लाख लोक कर्करोगाच्या विळख्यात.
५.५ लाख नवे मुख आणि गळ्याच्या कर्करोगाची प्रकरणे दरवर्षी.
२७ % पुरुष आणि १२ % हिला गळा आणि मुख कर्करोगपीडित.
२०२० पर्यंत भारतात कर्करोगाचे १७ लाख नवी प्रकरणे समोर येणार
तंबाखूप्रमाणे साखरमिश्रित पेयांवरही लावावा कर : तज्ज्ञ
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कर्करोग रोखण्यासाठी तंबाखू उत्पादनांवर जशी बंदी घातली जात आहे तशीच साखरेचा वाढता वापर रोखण्यासाठी सरकारने अशा सॉफ्ट ड्रिंक्सवर उत्पादनांवरही कर लावायला हवा. म्हणजे त्याचा वापर कमी होईल. डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले होते की, साखरेपासून तयार सॉफ्ट ड्रिंक्सवर कर लावल्याने त्यांचा वापर कमी होईल. त्यामुळे टाइप २ डायबिटीस आणि दातांच्या समस्या रोखण्यात मदत मिळेल.

मेक्सिकोने नॉन अल्कोहोलिक बेव्हरेज प्रॉडक्ट, हंगेरीने साखर, मीठ आणि कॅफिन ड्रिंक्सवर कर लावला आहे. फिलिपाइन्स, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन आणि आयर्लंडमध्येही असे कर आहेत.

२ वर्षांच्या मुलांतही कॅव्हिटी
डॉ. खरवंदा यांच्या म्हणण्यानुसार, १ ते २ वर्षांपर्यंत मुलांमध्येही दातांच्या समस्या आहेत. अनेक महिला दुधाची बाटली मुलाच्या तोंडात सोडतात. त्यामुळे दुधातील साखर मुलांच्या दातांच्या आसपास जमा होते. नंतर ती दातांची समस्या होते.

२५ टक्के युवकांचे दात वाकडे
एम्समध्ये दंततज्ज्ञांच्या मते, देशातील १० ते ३० वर्षांपर्यंतच्या २५ % युवकांचे दात वाकडे आहेत. आयटी क्षेत्र विशेषत: कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या युवकांना हाय शुगर ड्रिंक्स आणि बेव्हरेज प्रॉडक्ट्सच्या वापराने डेंटल प्लेक होतो. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांतील लोकांतही तोंडाचा दुर्गंध, पायोरिया आणि डेंटल कॅव्हिटीची समस्या वाढत आहे.
बातम्या आणखी आहेत...