आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमांवर कायमस्वरूपी छावण्यांमुळे तणाव; सागरी हद्दींविषयी सीतारमण यांनी व्यक्त केली चिंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- विस्तारवादी धोरण असलेली राष्ट्रे भारतीय सीमांवर कायमस्वरूपी तळ ठोकून आहेत. सागरी क्षेत्रावरही त्यांची अतिरेकी गस्त आहे. यासाठी विविध सबबी पुढे केल्या जातात व तणाव वाढतो, असे मत संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले. भूमी आणि सागरी सीमांचे लष्करीकरण होत असल्याने राष्ट्रांमधील संबंधात गुंतागुंत निर्माण होत आहे. दशकांपासून हिंद महासागर शांत सागरी क्षेत्र राहिले आहे. मात्र वाढत्या असुरक्षिततेमुळे येथे संरक्षणास्तव गुंतवणूक करणे आता भाग आहे. क्षेत्रीय सुरक्षेसाठी याशिवाय पर्याय नसल्याचे सीतारमण म्हणाल्या. गोवा मेरीटाइम कॉन्क्लेव्हच्या उद््घाटनप्रसंगी त्या  बोलत होत्या. 

ब्ल्यू इकॉनॉमीमुळे सैन्यांचे सागरांवर अधिक्रमण : सध्या जगभरात अराजकीय संघटनांचा वावर वाढला आहे. या संस्था राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवर प्रभाव वाढवत आहेत. मानवाधिकार संघटन, विविध स्वयंसेवी संस्था आणि इतर जागतिक संघटनांचा वावर सीमा क्षेत्रात आहे. त्यांचा दबाव असल्यानेदेखील प्रत्येक राष्ट्राला येथील गस्त वाढवणे क्रमप्राप्त आहे. शिवाय भविष्यात सागरी स्रोतांचे अर्थकारणात विशेष महत्त्व राहील. शुद्ध खनिजे आणि इतर संसाधने यांचा स्रोत सातत्याने सुरू राहिला तरच देशाची ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत होऊ शकते.  बदलत्या परिस्थितीत मजबूत सागरी सुरक्षा अत्यावश्यक असल्याचे मत निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले.  

अमेरिकी प्रतिनिधी मंडळाची उपस्थिती
या कॉन्क्लेव्हमध्ये भारत-अमेरिका सागरी सुरक्षा संवादाला सर्वाधिक महत्त्व आहे. जागतिक बँकेने ब्ल्यू इकॉनॉमीचे धोरण शाश्वत विकासाशी निगडित असावे यावर भर दिला आहे. त्या दृष्टीने उभय देशांतील प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गोव्यातील कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आेशिनोग्राफी येथे द्विपक्षीय चर्चेचे आयोजन केले आहे. अमेरिकी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पर्यावरण सहसचिव ज्युडिथ गार्बर करतील. 
 
संघर्ष टळणे गरजेचे :  लांबा   
गोवा मेरीटाइम कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना भारताचे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी म्हटले की, दहशतवाद्यांचा संचार, अमली पदार्थ तस्करी, देशांचे विस्तारवादी धोरण, सागरी संसाधनांवर मालकीची स्पर्धा ही सध्या प्रमुख आव्हाने आहेत. संघर्ष टाळून उभय सागरी सीमांचा आदर राखणे महत्त्वाचे झाले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...