आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : सीमेवर भारतीय सैनिकांना शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवणार बंकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद  - लष्करासाठी सीमेवर शत्रूशी आणि देशात नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी फरिदाबादमध्ये एक नवे सुरक्षा कवच तयार केले जात आहे. देशाच्या सीमेवर शत्रूशी तोंड देण्यासाठी सिमेंट आणि मातीऐवजी प्रथमच हलवता येण्याजोगे बुलेटप्रूफ बंकर तयार केले जात आहे. 
 
लष्करासाठी साहित्य उत्पादन करणाऱ्या फरिदाबादच्या एका कंपनीने ते तयार केले आहे. आता त्याची चाचणी घेतली जात आहे. लष्कराच्या सुरक्षेत लवकरच फरिदाबादच्या या सुरक्षा कवचाचा समावेश होणार आहे. या सुरक्षा कवचाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका जागेवरून दुसरीकडे सहजपणे नेले जाऊ शकेल. लाकूड, माती आणि सिमेंटच्या बंकरचे स्थान बदलणे शक्य होत नाही. या बंकरबाबत ते सहजशक्य होईल. नवे बंकर बुलेटप्रूफ पोलादाच्या अनेक तुकड्यांद्वारे तयार होईल. ते घातक वार झेलण्यास सक्षम असेल. विशेष म्हणजे युद्धाच्या व्यूहरचनेच्या हिशेबाने शत्रूला चकमा देण्यासाठी त्याचे लोकेशन बदलता येऊ शकेल. म्हणजे सैनिक आपल्या सोयीनुसार बुलेटप्रूफ मूव्हेबल बंकर एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊ शकतील. त्यामुळे बंकरमध्ये राहणारे सैनिक शत्रूच्या स्थानाचा अंदाज घेऊ शकतील. 
 
विशेषत: संवेदनशील जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर या बंकरची उभारणी केली जाऊ शकते. तेथे भारतीय सैनिकांना सर्वाधिक धोका आहे. एक बंकर १० बाय १२ फुटाचे असेल. त्यात विशेष प्रकारचे पोलाद वापरले जाईल. हे बंकर रॉकेट प्रक्षेपकाच्या हल्ल्यालाही तोंड देता येईल एवढे भक्कम आणि सुरक्षित असेल. म्हणजे त्यात सैनिक पूर्णपणे सुरक्षित राहतील.  
 
कंपनीने तयार केले आहे बुलेटप्रूफ जॅकेट, शिरस्त्राण
या कंपनीने आतापर्यंत लष्करासाठी बुलेटप्रूफ जॅकेट आणि शिरस्त्राण तयार केले आहे. अलीकडेच उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लष्कराच्या शिबिरात २७ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत बुलेटप्रूफ शिरस्त्राणामुळे तोफखाना विभागाचे सैनिक ऋषिकुमार हे वाचले. एवढेच नाही तर त्यांनी दोन शत्रू सैनिकांनाही ठार केले. दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली होती.
बातम्या आणखी आहेत...