आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलची बोली प्रक्रिया आज, बीसीसीआयमध्ये बदलानंतर प्रथमच आयपीएल बोली; 148.33 कोटींचे पर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू  - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या सत्रासाठी सोमवारी बोली प्रक्रिया होणार आहे. यात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंसह भारताच्या काही उदयोन्मुख खेळाडूंवरही नजर असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिव अजय शिर्के यांची हकालपट्टी होऊन नव्या चारसदस्यीय प्रशासकीय पॅनलच्या नियुक्तीनंतर ही पहिली आयपीएल आहे. 
 
बोलीत ३५१ खेळाडू सहभागी होतील. यात १२२ आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या वेळी बोलीत सहा असोसिएट देशांच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ७९९ खेळाडूंनी बोलीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. यातील ३५१ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. सर्व संघांचे मिळून एकूण १४८.३३ कोटी रुपयांचे पर्स आहे. सर्वाधिक पर्स किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे.  सकाळी ९ वाजेपासून बोली प्रक्रियेला सुरुवात होईल.
 
सर्वाधिक ब्रेस प्राइस दोन कोटींची अाहे. यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, इयान मोर्गन, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन, पॅट कमिन्स यांच्याशिवाय लंकेचा अँज्लो मॅथ्यूजचा समावेश आहे. १.५ कोटी रुपये आधार किंमत असलेल्या खेळाडूंत जॉनी बेयरस्ट्रो, ट्रेंट बोल्ट, ब्रेड हॅडिन, केली अॅबोट, जेसन होल्डरचा समावेश आहे.  
 
भारताच्या या खेळाडूंवर असेल लक्ष : हैदराबादचा हिटर तन्मय अग्रवाल, केरळचा गोलंदाज बेसिल थंपी, केरळचा सलामीवीर विष्णू विनोद आणि झारखंडचा युवा स्टार ईशांक जग्गी यांच्यावर बोलीत नजर असेल.
 
टीम आणि पर्स
पंजाब                 २३.३५ कोटी रु.  
दिल्ली                 २३.१० कोटी रु.  
हैदराबाद              २०.९ कोटी रु.    
कोलकाता             १९.७५ कोटी रु.    
रायझिंग पुणे         १७.५ कोटी रु.    
गुजरात लायन्स    १४.३५ कोटी रु.    
बंगळुरू                १७.८२ कोटी रु.    
मुंबई इंडियन्स     ११.५५ कोटी रु.
 
इंग्रजांची डिमांड अधिक
टीम या वेळी इंग्लिश खेळाडूंना खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. बेन स्टोक्सची सर्वाधिक मागणी आहे. मोर्गन लीगमध्ये तीन संघांसाठी खेळला आहे. बटलर मुंबईसाठी, सॅम बिलिंग्स दिल्लीसाठी, जॉर्डन बंगळुरूसाठी खेळला आहे. द. आफ्रिकेचे खेळाडू ७ मेनंतर आयपीएल खेळणार नाहीत, तर इंग्लंडचे खेळाडू दोन टप्प्यांत माघार घेतील. 
बातम्या आणखी आहेत...