आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मुनीने सुख-शांतीच्या बहाण्याने व्हॉट्सअॅपवर मागितले पीडितेचे निर्वस्त्र छायाचित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - ब्रह्मचर्याचा दावा करणाऱ्या जैन मुनी शांतिसागरने सुख-शांतीच्या पाठाच्या बहाण्याने पीडितेचे निर्वस्त्र छायाचित्र व्हॉट्सअॅपवरून मागवले होते. पीडितेने समुपदेशक, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञाच्या माध्यमातून दिव्य भास्करच्या प्रतिनिधी ऐषा दादावाला यांना आपबीती सांगितली. पीडितेने सांगितले की, आईवडिलांच्या सुख, यशासारख्या गोष्टी सांगून शांतिसागरने आपल्याला घाबरवले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. वाचा पीडितेची आपबीती...

कपडे न काढल्यास आईवडील मरून जातील, अशी धमकी दिली
३१ मार्च रोजी मांडवीत मी पहिल्यांदा कुटुंबीयांसोबत आचार्य शांतिसागरची भेट घेतली. त्याच्या प्रवचनाने आम्ही मंत्रमुग्ध झालो. शिष्यत्व पत्करण्याची विनंती करत त्यांच्याकडून धार्मिक शिक्षण घेणे सुरू केले. दरम्यान, शांतिसागर मला एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलही करू लागले. 

दोन महिन्यांपूर्वी शांतिसागरने फोन करून म्हटले की, ‘तुझ्या सुखशांतीसाठी जप करायचा आहे, फोटो पाठव.’ मी पाठवून दिले. त्यांनी पुन्हा फोन करत म्हटले, ‘मला मित्र समज, विधीसाठी एक निर्वस्त्र छायाचित्र हवे आहे.’ चातुर्मासासाठी सुरतला बोलावले. विधी-जपाच्या दक्षिणेच्या नावाखाली नाचायला लावले. १३ दिवसांपूर्वी मला जपासाठी सुरतला बोलवत रात्री थांबण्यास सांगितले. रात्री त्याने माझ्या आईवडिलांना एक वर्तुळ आखून त्यात बसवले. भावाला दुसऱ्या खोलीत बसवले आणि माझ्या शरीरावर मोरपंख फिरवत मला सोबत आत घेऊन गेले. तिथे विचारले, ‘तुला काय हवे आहे?’ मी उत्तरले, ‘आम्ही सुखी राहावे.’ ते म्हणाले, ‘ठीक आहे, मी म्हणतो तसे कर.’ मला कपडे काढण्यास सांगितले. मी संकोच करताच मला म्हणाले, ‘आईवडिलांना सुखी पाहायचे असेल तर कपडे काढ. अन्यथा ते मरतील.’ त्यानंतर त्याने धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. वडोदरा येथे परत येत असताना कुटुंबीयांना आपबीती सांगितली. दुसऱ्या दिवशी वकिलांना भेटलो. त्यांनीच तक्रार करण्यास सांगितले.
 
स्त्रीरोगतज्ज्ञाच्या तपासणीत बलात्काराची खात्री पटली.  जैन मुनीविरोधात तक्रार केल्यास समाज काय करेल, ही भीती होती. दरम्यान, मानसोपचारतज्ज्ञाच्या समुपदेशनातून मला बळ मिळाले. मुनीला शिक्षा मिळायलाच हवी, असे मी वडिलांना सांगितले. वडोदरा महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे विभागाचे डीसीपी सरोज कुमार यांनी सुरतचे एसीपी विधी चौधरी यांच्याशी चर्चा केली. नंतर सुरतमध्ये येऊन तक्रार दिली. 

मंदिर व्यवस्थापनाचा दावा
पिच्छी बदलण्याच्या बोलीच्या ३ कोटींपैकी ४० टक्के कमिशन न दिल्याचा आरोप लावला महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त आर. जी. शहा यांच्या मते, २९ सप्टेंबर रोजी परवटपाटियामध्ये पिच्छी परिवर्तनासाठी २.९९ कोटींची बोली लागली होती. पीडितेच्या वडिलांनी शांतिसागरकडून ४०% कमिशन मागितले होते. शांतिसागरवर याच मंदिरात दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. जैनांचे चारही फिरके पीडितेच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करतील, असे शहा यांनी म्हटले आहे.

मुनी बनण्यापूर्वी होते चहाचे दुकान
 मुनी बनण्यापूर्वी शांतिसागरचे कोट्यात चहाचे दुकान होते. १९९३ मध्ये आचार्य कल्याणसागर यांच्या संपर्कात येऊन धर्मांतर केले.  त्याच्यावर तंत्र-मंत्राचेही आरोप झाले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...