आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लष्करी अधिका-यांसह ५ जणांना जन्मठेप, काश्मिर बनावट चकमक प्रकरणी शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू -काश्मीर - ०१० मधील माछील येथील बनावट चकमक प्रकरणात लष्करातील दोन अधिका-यांसह पाच सैनिकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोषींना सेवेतून निलंबित करण्यात येईल. त्याचबरोबर सेवेचे कोणतेही लाभ त्यांना मिळणार नाहीत.

नियंत्रण रेषेजवळ तीन घुसखोरांना मारल्याचा दावा तेव्हा लष्कराने केला होता. परंतु मृत नागरिक त्याच भागातील निष्पाप ग्रामस्थ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. कर्नल डी. के. पठानिया आणि कॅप्टन उपेंद्र यांच्यासह हवालदार देविंदर, लान्स नायक लक्ष्मी आिण लान्स नायक अरुणकुमार हे कोर्ट मार्शलमध्ये दोषी ठरले. याच प्रकरणात आरोपी असलेल्या सुभेदार जवानाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हा इशारा समजावा : अब्दुल्ला
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी कोर्ट मार्शलच्या या निकालाबाबत ट्विट करताना म्हटले आहे की, निष्पाप लोकांचे प्राण घेऊ पाहणा-यांनी हा निकाल म्हणजे इशारा समजावा. हा निकाल ऐतिहासिक आहे.
काश्मीर पेटले
या घटनेनंतर संपूर्ण खो-यात लष्कराविरुद्ध उग्र निदर्शने सुरू झाली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात १२१ लोक मारले गेले. या बनावट चकमकीचे प्रकरण लष्कराने डिसंेबर २०११ मध्ये कोर्ट मार्शलसाठी पाठवले. अखेर लष्कराचे २ अधिकारी व ३ जवानांना दोषी ठरवण्यात आले.
पाकिस्तानी घुसखोर ठरवून हत्या एप्रिल २०१० मध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ माछील सेक्टरमध्ये तीन पाकिस्तानी घुसखाेर चकमकीत ठार झाल्याचा दावा लष्कराने केला होता. यात मोहंमद शफी, शहजाद अहमद आणि रियाझ अहमद मारले गेले. या तिघांनाही नोकरी व पैशाचे आमिष दाखवून लष्करी अधिकारी व जवान नियंत्रण रेषेजवळ घेऊन गेले होते, असा दावा मृतांच्या नातेवाइकांनी केला होता.