आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज अर्धा किलो मिरची जाळून कारखान्याचा निषेध, जावित्रीदेवींचा जळजळीत उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेवाडी- येथील शहर पोलिस कर्मचारी सध्या एका अनोख्या कात्रीत अडकले आहेत. संघीवाडा कॉलनीत एक वृद्ध महिला दररोज अर्धा किलो मिरची जाळून त्याचा धूर करत आहे. त्याचा ठसका आणि धुरामुळे कॉलनीतील लोक त्रासून गेले आहेत.

याबाबत लोकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दोन पोलिस महिलांच्या घरी पोहोचले. त्यांनी चौकशी केली. त्या वेळी वेगळाच प्रकार समोर आला. ही महिला अनेक दिवसांपासून तिच्या घराजवळ असलेल्या तांब्या बनवणाऱ्या कारखान्याच्या विरोधात तक्रार देत आहे. परंतु त्यावर कुणी काहीच कारवाई केलेली नाही. त्यावर महिलेने हा अनोखा आणि अघोरी मार्ग स्वीकारला. यावर नेमकी कारवाई काय करावी या संकटात पोलिस सापडले आहेत. संघीवाडा कॉलनीतील एका घरात जावित्रीदेवी एकट्या राहतात. त्यांचा दुसरा विवाह झाला होता, परंतु पतीचे निधन झाले आहे. जावित्रीदेवींच्या शेजारी एक तांबे तयार करण्याचा कारखाना आहे. तेथे दिवसभर मशीन चालतात. त्याच्या आवाजाने व्हायब्रेशनमुळे जावित्रीदेवी त्रस्त आहेत. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री खिडीपासून प्रदूषण िवभागापर्यंत सर्वांकडे तक्रार केली. पण कारवाई झाली नाही.

जावित्रीदेवी गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरी दररोज मिरच्या जाळत आहेत. त्याच्या ठसक्याने लोक त्रस्त आहेत. त्यांना खोकल्यासह गळा सुजणे, डोळे जळजळ करणे, ठसका लागणे असा त्रास सुरू झाला आहे. महिनाभरापासून हा नित्यक्रम सुरू आहे. त्याला कंटाळून लोकांनी ठाण्यात धाव घेतली.

कारखाना बंद केला तरच मिरची जाळणे बंद करीन
पोलिसांनी जेव्हा जावित्रीकडे विचारणा केली तेव्हा ती कॉलनीवाल्यांवरच भडकली. ती म्हणाली, “लोक नव्हे, तर मीच कारखान्यामुळे त्रस्त आहे. तिथे कायम मशीन सुरू असते. त्यामुळे माझ्या घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्याची मी अनेकदा दुरुस्ती केली, पण अजूनही कारखाना सुरूच आहे. त्याच्या आवाजाने मी रात्रभर झोपू शकत नाही. कॉलनीचे लोक माझा तिरस्कार करतात. त्यांना माझे घर बळकावयाचे आहे. जोपर्यंत लोक कारखाना बंद करत नाहीत तोवर मी मिरची जाळतच राहणार.
बातम्या आणखी आहेत...