आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरींबद्दल उमाळा आहे, चर्चा करा : सिंग; फुटीरतावादी नेत्यांना आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- फुटीरतावादी काश्मिरी जनतेचे खरे हितचिंतक असतील तर त्यांनी केंद्राचे विशेष प्रतिनिधी दिनेश्वर शर्मा यांच्याशी बोलणी करावीत, असे आवाहन जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी केले आहे.

हुरियत नेत्यांना काश्मिरी जनतेबद्दल इतका उमाळा असेल तर त्यांनी शर्माशी बोलणी केली पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. जम्मू काश्मिरमधील कट्टर संघटना हुरियत कॉन्फरन्स, जेकेएलएफ आणि अन्य एका जहाल संघटनेने संयुक्त समिती स्थापन केली असून त्यांनी शर्मा यांच्याशी बोलणी करण्यास नकार दर्शवला आहे. 
त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.ज्यांना काश्मिर खोऱ्यात शांतता हवी आहे, अशा संघटनांनी चर्चेसाठी पुढे आले पाहिजे, अशी भूूमिका सिंग यांनी मांडली. काश्मीरमधील ज्या संघटना अथवा नेते या चर्चेस जाणार नाहीत, त्यांची भूमिका जनतेसमोर उघड होईल. 

हुरियत नेत्यांना वगळून बोलणी झाल्यास त्याला काही अर्थ उरेल काय? या प्रश्नांवर बोलताना सिंग म्हणाले, निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचे खरे प्रतिनिधी आहेत. केंद्राशी बोलणी करण्यासाठी कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. ज्यांना वाटते त्यांनी बोलणी करावीत. ही तर केवळ सुरुवात आहे, असे सिंग यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यातून चांगला व योग्य तोडगा निघू शकेल, असा दावा त्यांनी केला. जर कोणी चर्चेचे दरवाजे बंद करत असेल तर काश्मिरी जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.  हे नेते पाकिस्तानच्या दबावाखाली काम करत आहेत, असे उघड सिद्ध होईल, त्यांचा खरा चेहरा जनत ेसमोर येईल असे सिंग म्हणाले.
 
 
पाकिस्तानकडून दहशतवादाला उत्तेजन
पाकिस्तानकडून दहशतवादाला उत्तेजन मिळत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री निर्मलसिंग म्हणाले काश्मिरी तरुणांना दगडफेक करण्यासाठी, निदर्शने करण्यासाठी  भडकावण्याचे काम पाकिस्तानकडून होत आहे. त्यामुळे खोऱ्यात उफाळलेल्या हिंसाचारात निष्पाप तरुणांचे बळी जात आहेत, जहाल नेत्यांचा मुखवटा काश्मिरी जनतेसमोर उघड होईल, असे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...