आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील शुक्रवारचा बंद मागे घेतल्याची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर  - काश्मीरमधील फुटीरवादी संघटनांनी शुक्रवारचा नियोजित बंद मागे घेण्याची घोषणा सोमवारी केली. शुक्रवारी महाशिवरात्र असल्यामुळे बंद पाळण्यात येऊ नये, अशी विनंती काश्मिरी पंडितांनी केली होती. त्यामुळे बंद मागे घेण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.  
 
सईद अली शाह गिलानीच्या नेतृत्वाखालील गटाचे प्रवक्ता अयाज अकबर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, महाशिवरात्र लक्षात घेऊन शुक्रवार, २४ फेब्रुवारीचा नियोजित बंद पाळण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती अनेक काश्मिरी पंडितांनी केली होती. 
 
अनेक काश्मिरी पंडित आमच्या संपर्कात आहेत. ते आमचाच एक भाग आहेत. त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही बंदचे आवाहन मागे घेतले आहे. निषेध आंदोलनातील उर्वरित कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याचे पालन करण्यात यावे, असे आवाहन आम्ही लोकांना केले आहे.  
 
हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हान वानी हा गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. त्याच्या निषेधार्थ सईद अली शाह गिलानी, मिरवैझ उमर फारूक आणि मोहम्मद यासिन मलिक हे फुटीरवादी नेते दर आठवड्याचे निषेधाचे वेळापत्रक जाहीर करतात. त्यानंतर गेल्या ऑक्टोबरपर्यंत आठवड्यातील पाच दिवस बंद पाळण्यात येत होता.
 
आता फक्त शुक्रवारी बंद पाळण्यात येतो. बुऱ्हान वानी चकमकीत ठार झाल्यापासून काश्मीरी युवक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याचा परिपाठच सुरू झाला आहे.  वानीचा मृत्यूची धग अद्यापही शमली नाही. 
बातम्या आणखी आहेत...