आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी धुमश्चक्री; ५० जण जखमी, काश्मीरमुक्तीपर्यंत लढा : गिलानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- गुरुवारी काश्मीरमधील अनेक भागात हिंसक घटना घडल्या. फुटीरवादी गट सुरक्षा दल यांच्यातील धुमश्चक्रीत किमान ५० जण जखमी झाले. श्रीनगरच्या नौहाटा, बारामुल्ला भागात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांडीपोरा भागात काश्मिर स्वतंत्र करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला.

बांडीपोरातील मोर्चाला सईद अली शहा गिलानीने फोनवरून मार्गदर्शन केले. काश्मिर स्वतंत्र होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असे गिलानींनी म्हटले आहे. गुरूवारी सकाळपासूनच फुटीरवादी लोकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. आेमपोरामध्ये मोर्चाला हिंसक वळण मिळाले. निदर्शकांनी सुरक्षा दलावर दगडफेक केली. शहरातील गुलशन चौकात निदर्शकांत मोठी धुमश्चक्री उडाली. अनंतनाग तसेच कुलगावमध्ये आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या होत्या. महिलांना मोर्चा काढला होता. श्रीनगरमध्ये फुटीरवादी नेता गिलानीचा मुलगा नईम याच्या गाडीची गुरूवारी तोडफोड करण्यात आली. जमावाशी झालेल्या वादानंतर नईमच्या वाहनावर हल्ला केला. दरम्यान, काश्मिरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे फुटीरवादी नेता मिरवेझ यासिन मलिकला वेगवेगळ्या तुरूंगात ठेवले आहे.
बातम्या आणखी आहेत...