आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री चंडींची १४ तास चौकशी, सौर पॅनल घोटाळाप्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम - सौर पॅनल घोटाळाप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांची न्यायालयीन आयोगाने १४ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. ते साक्षीदार म्हणून हजर राहिले होते. ते न्यायालयीन आयोगासमोर उपस्थित होणारे केरळचे पहिले मुख्यमंत्री ठरले. आपण काहीही चुकीचे केले नाही. त्यामुळे पॉलिग्राफची गरज नाही, असे चंडी म्हणाले. आयोगासमोर साक्ष देताना चंडी म्हणाले की, माझ्यावरील आरोप राजकारणाने प्रेरित आहेत. घोटाळ्याबाबत साक्षी नोंदवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.

हा घोटाळा २०१३ मध्ये उघडकीस आला होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सरकार अडचणीत आले होते. चंडी यांना साक्ष देता यावी म्हणून आयोगाने शासकीय विश्रामगृहात आपली बैठक घेतली.