आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेमान चंडींविराेधी आदेशाला स्थगिती, दक्षता न्यायालयाने कक्षा आेलांडून दिले आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची- सौर पॅनल घोटाळ्यात केरळचे मुख्यमंत्री आेमान चंडी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या दक्षता न्यायालयाच्या आदेशाला शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ऊर्जामंत्री अरायादान मोहंमद यांनाही न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
चंडी आणि मोहंमद यांनी दक्षता न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती पी. उबैद म्हणाले, चौकशी आयुक्त आणि दक्षता न्यायाधीश, त्रिसूर यांनी आपल्या अधिकारांचे स्वरूप आणि कक्षा लक्षात न घेता हे कोणतेही पुरावे नसताना आदेश बजावले आहेत, अशा शब्दांत खडसावतानाच दक्षता न्यायाधीशांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे संकेतही न्यायमूर्तींनी दिले. चंडी यांनी दाखल केलेल्या याचिकेत दक्षता न्यायालयाच्या आदेशातील त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तपत्रातील बातम्यांच्या कात्रणांचा आधार घेऊन न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते, असे चंडी यांनी याचिकेत नमूद केले होते. दरम्यान, दक्षता न्यायाधीश एस.एस. वासन आदेश देताना म्हणाले होते की, गावातील एखादा माणूस असो की मुख्यमंत्री. कायद्यासमोर सर्व समान अाहेत. चंडी, मोहंमद आणि इतर सहा जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले हाेते.

निदर्शने सुरूच
सौर ऊर्जा घोटाळ्यात शुक्रवारी देखील तिरुवनंतपुरममध्ये निदर्शने सुरूच होती. सचिवालयाच्या बाहेर भाजपच्या युवा मोर्चा आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री चंडी यांच्या विरोधात निदर्शने केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

पुढील स्लइड्सवर वाचा, जजची व्हीआरएस... चंडींच्या मुलाचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप...