आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPECIAL: महिनाभरानंतर IIT मध्ये शिक्षण घेईल हा तरुण, कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी उचलतो दगड-विटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काउंसिलिंगला आणखी अवधी असल्याने महावीर सध्या आई व भावासोबत मजुरी करत आहे. - Divya Marathi
काउंसिलिंगला आणखी अवधी असल्याने महावीर सध्या आई व भावासोबत मजुरी करत आहे.
जोधपूर - परिस्थितीशी झगड गुणवत्ता सिद्ध केली तरी पोटाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी मजुरीही करणे भाग पडत असल्याचे दृश्य राजस्थानमधील एका शहरात पाहावयास मिळत आहे. मजुरी करणाऱ्या या मुलाचे नाव महावीरकुमार मौर्य असून तो राजस्थानातील पालीचा रहिवासी आहे. सध्या तो कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी आई आणि मोठ्या भावासोबत  मजुरी करत आहे. मात्र, तो जुलै-ऑगस्टमध्ये देशातील कोणत्याही एका आयआयटी संस्थेतून अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा प्रारंभ करेल.
 
महावीर गेल्या वर्षी शिकवणीशिवाय १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाला. विशेष म्हणजे त्याने आयआयटी परीक्षेतही यश संपादन केले. प्रवेशासाठी १२ वीत ७० टक्के गुण आवश्यक होते.मात्र, तीन गुण कमी पडल्यामुळे त्याला प्रवेश घेता आला नाही. यानंतर त्याने पुन्हा १२ वी करण्याचा विचार केला. यादरम्यान वडिलांचे निधन झाल्याने छत्र हरपले. घरात ओढवलेल्या अशा संकटात त्याच्यापुढे काम करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अखेर त्याने शिक्षण सोडून घरखर्च भागवण्यासाठी मजुरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशा स्थितीतही त्याची शिक्षणाची भूक कायम होती. गरीब विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून मोफत शिकवणारा गुरू मिळेल काय, याचा शोध सुरू होता. अशात महावीरच्या मोठ्या भावास   जोधपूरमधील अशाच एका कोचिंग क्लासची माहिती मिळाली. अभियांत्रिकी शिक्षणाची मोफत तयारी करण्यासोबत विद्यार्थ्यांच्या मोफत निवास व जेवणाची सोय केली जात असल्याचे त्याला कळाले. भावाने महावीरला या क्लासमध्ये प्रवेश मिळवून दिला. इथे आल्यानंतर त्याला कळले की बारावीत ६५ टक्के गुण मिळूनही आयआयटीत प्रवेश मिळू शकेल. मात्र,त्यासाठी जेईई अॅडव्हान्स  उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्याने दुसऱ्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या श्रेणीत ९७२ वी रँक आली आहे.
बातम्या आणखी आहेत...