आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व राजाच्‍या या नातवाने केले वेटरचे काम, आता आहे अशी पेज 3 लाइफस्‍टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - राजस्थानची भूमी राजा-महाराजांच्‍या कतृत्‍वाची शान राहिली आहे. मोठ मोठ्या किल्‍ल्यांमध्‍ये राहणा-या राजा-महाराजांचे आजचे वंशज बॉलीवुडच्‍या पेज 3 पार्टींमध्‍ये दिसतात. मेवाड राजघराण्‍याचे पूर्व राजा भगवत सिंह यांचे नातू लक्ष्यराज सिंह हे अशाच प्रकारे बॉलीवुडमधील चेह-यांसोबत दिसतात. मात्र, आज राजेशाही थाटात राहणा-या लक्ष्यराज यांना काही दिवसांसाठी वेटरचे कामही करावे लागले. 13 डिसेंबरला लक्ष्यराज यांचे वडिल अरविंद सिंह यांचा जन्‍मदिवस आहे. त्‍यानिमित्‍त divyamarathi.com च्‍या या संग्रहातून जाणून घेऊया लक्ष्‍यराज यांच्‍या परिसरासंबंधित काही खास बाबी.
लक्ष्यराज यांचा जन्‍म 28 जानेवारी 1985 मध्‍ये झाला. ते मेवाड राजघराण्‍याचे संरक्षक अरविंद सिंह यांचे एकुलते एक पुत्र आहेत. लक्ष्यराज यांचे सुरूवातीचे शिक्षण अजमेरच्‍या मेयो कॉलेजमधून पूर्ण झाले. त्‍यानंतर त्‍यांनी ऑस्‍ट्रेलियातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हॉस्पिटेलिटी कोर्ससाठी त्‍यांनी सिगापूर गाठले. शिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर वेटरचे काम करून लक्ष्‍यराज यांनी करियरला सुरूवात केली. ऑस्‍ट्रेलियातील हॉटेल्‍स आणि कॅफेमध्‍ये त्‍यांनी काम केले. त्‍यांनतर ते उदयपूरला आले व त्‍यांनी आपल्‍या कुटुंबाचा बिझनेस सांभाळला. आता ते एचआरएच ग्रुप ऑफ होटल्सचे एक्‍झिकेटिव्‍ह डायरेक्टर आहेत. लक्ष्‍यराज यांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्‍यांच्‍या वडिलांप्रमाणे ते मोठमोठ्या कार्यक्रमांमध्‍ये सहभागी होतात. बॉलीवुड आणि राजघराण्‍यांच्‍या पेज 3 पार्टी आणि लग्‍नसोहळ्यांमध्‍येही ते सहभागी होतात.
मोटर-स्पोर्ट्स संबंधी कार्यक्रम प्रमोट करतानाही ते दिसतात.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, लक्ष्‍यराज यांच्‍या लग्‍झरी लाइफस्‍टाइलचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...