आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये लालू-नितीश आघाडी फुटीच्या मार्गावर, तेजस्वींनी राजीनामा न दिल्याने पेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यासपीठावर तेजस्वींची रिकामी खुर्ची. - Divya Marathi
व्यासपीठावर तेजस्वींची रिकामी खुर्ची.
पाटणा - बिहारमध्ये सत्तारूढ आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रीय जनता दल आणि जनता दलातील (संयुक्त) वाद शनिवारी विकोपाला गेला. लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर भ्रष्टाचारप्रकरणी धाडी पडल्यानंतर पेटलेला वाद उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा न दिल्याने अधिकच भडकला. भाजपला राज्यात रोखण्यासाठी एकत्र आलेले मुख्यमंत्री नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्या आघाडीत आता तेजस्वी आडकाठी ठरत आहे. तेजस्वींनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बरखास्त करू, असा इशारा देत नितीश यांनी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
 
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाला तेजस्वी अनुपस्थित होते. व्यासपीठावर तेजस्वी यांची नेमप्लेट अगोदर कागद लावून झाकण्यात आली. नंतर ती काढून टाकण्यात आली.भ्रष्टाचाराच्या आरोपावरून घेरलेले तेजस्वी यांच्यावर तत्काळ कारवाई करा, असा इशारा देऊन नितीश यांनी चार दिवसांचा अवधी लालूंना दिला होता. शनिवारी ही मुदत संपली तरी तेजस्वींनी पद सोडलेले नाही.
 
लालूंसमाेरील अडचण : महाआघाडीत बिघाडी नको कारण...
भाजपला आगामी निवडणुकीसाठी मोकळे रान मिळेल या भीतीपोटी लालू यांना महाआघाडीत फूट नको आहे. राजदने २०१० मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून केवळ २२ जागा जिंकल्या होत्या. तेजस्वींवर तुरुंगात जाण्याची  वेळ आली तरी आघाडी मोडण्यासाठी ते पुढाकार घेणार नाहीत. भाजपला दूर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील.
 
नितीश यांच्यासमोरील अडचणी : महाआघाडी ठेवू इच्छितात कारण...
राजदने पाठिंबा काढून घेतल्यास केवळ भाजपचेच ५८ आमदार त्यांना वाचवू शकतात. मात्र, धाेका असा की भाजपच्या जवळीकतेमुळे मतपेढी निसटू शकते. २०१० मध्ये जदयूचा मतांचा वाटा २२.६१% होता. १४१ जागा लढवून ११५ उमेदवार जिंकले होते. २०१३ मध्ये मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होताच नितीश रालोआमधून बाहेर पडले होते.
 
राजीनाम्याचा पर्याय
तेजस्वी यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यास वाद निवळेल. सीबीआय गुन्हा दाखल करत असल्याचे जदयूचे म्हणणे आहे. त्यामुळे तेजस्वी यांना नैतिकदृष्ट्या पायउतार व्हायला हवे. त्यांनी राजीनामा न दिल्यास नितीश आरोपपत्र दाखल होण्याआधी त्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देतील, असे मानले जाते.
 
महत्त्वाची बैठक आज
नितीश यांनी रविवारी आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून यात एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत तेजस्वी यांना बरखास्त करण्याचा निर्णय झाला तर नितीश सरकार पडेल आणि नवी राजकीय समीकरणे सुरू होतील, अशी शक्यता आहे.
 
वादाची सुरुवात झाली कशी? 
सीबीआयनेजुलै रोजी लालू, राबडीदेवी, लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. रोजी सीबीआयने लालू यांच्याशी संबंधित १२ ठिकाणांवर छापे टाकले. २००६ मध्ये रेल्वेमंत्री असताना हॉटेल्सच्या कंत्राटांचा हा घोटाळा आहे.