आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितिशकुमार राजकारणातील ‘पलटूराम’, लालूंची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी नितिश कुमार यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली. नितिश कुमार हे राजकारणातील पलटूराम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितिश कुमारांवर प्रहार करत लालू म्हणाले, “नितिश कुमार जातीयवादी असून प्रत्येक बाबतीत अपयशी ठरलेले आहे. फक्त खोटेच बोलण्याचे काम करत आहेत. 
 
तेजस्वीच्या चांगल्या कामाची प्रशंसा होऊ लागल्याने त्यांनी हा डाव रचला. ते सत्तापिपासू आहेत.’ नितिशकुमारांच्या ज्येष्ठत्वाच्या वक्तव्याचाही लालूंनी या वेळी खास बिहारी शैलीत समाचार घेतला. “मला नेता बनवल्याची नितिशकुमार भाषा करताहेत. उलट मीच त्यांना नेता बनवले. आधी कपाळावर चंदन लावून यायचे. आय अॅम सिनिअर टू हिम. दोन वर्षांपूर्वीच २०१४ च्या निवडणूकीत नामुष्कीजनक पराभव झाला होता. 
 
आम्ही ३४ तर नितिश यांनी फक्त १९ जागा जिंकल्या होत्या. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना जीवदान दिले. त्यांची ४० जागांची लायकी असतानाही आम्ही त्यांना १०० जागा दिल्या. ९० च्या दशकात निवडणूकीत रामलखन बाबू यांना विनंती करून कुमार यांना अारा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. 
बातम्या आणखी आहेत...