आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 पूर्वी दर सहा महिन्यांत होणार 5 राज्यांत निवडणुका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुका २०१९ मध्ये होणार आहेत. तत्पूर्वी १५ राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील. यात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि ओदिशा यासारखी मोठी राज्ये आहेत. तर मिझोराम, त्रिपुरा, हिमाचल, मेघालय, नागालँड यासारखी छोटी राज्ये पण आहेत. या निवडणुकाचे निर्णय भाजपचे नशिब ठरवतील.
 
- गुजरात, नागालँड, मेघालय, हिमाचल आणि त्रिपुरामध्ये २०१७ च्या अखेरीस निवडणुका : गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे आणि नागालँडमध्ये आघाडीचे सरकार आहे. हिमाचल मेघालयात काँग्रेसचे सरकार आहे.
- भाजप गुजरातेत मोठ्या प्रमाणावर यश मिळवण्यासाठी ताकद पणाला लावेल. उत्तर-पूर्वेच्या यशामुळे नागालँड,मेघालय,त्रिपुरामध्ये विजय मिळू शकतो.
 
- कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २०१८ मध्ये निवडणुका : भाजपला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये चौथ्या वेळी सरकार स्थापन करण्यासाठी आणि राजस्थानमध्ये सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
- मोठ्या राज्यापैकी फक्त  कर्नाटक काँग्रेसकडे आहे. येथे २००८ मध्ये भाजप, २०१३ मध्ये काँग्रेसने सरकार बनवले. यावेळी भाजपची शक्यता आहे.
 
- अरुणाचल, सिक्कीम, आंध्र, तेलंगाणा आणि ओडिसा मध्ये २०१९ च्या प्रारंभी निवडणुका होतील.    - या लोकसभेसह ही निवडणुका होऊ शकतात. आंध्र आणि अरुणाचल मध्ये भाजपाची युती असणारे सरकार आहे.
- तेलंगाणात टीआरएस, ओडिशा बीजद ची सरकार आहे. भाजपाचा प्रयत्न येथे शिरकाव करण्याचा असेल. 
 
येथे भाजपची सुनामीच; २०१९ ला विसरा, २०२४ ची तयारी करावी विरोधी पक्षांनी : उमर
 देशात आज असा कोणताही नेता नाही जो २०१९ मध्ये मोदी आणि भाजपाची स्पर्धा करु शकेल. आम्हाला २०१९ ला विसरुन २०२४ ची तयारी सुरु करायला हवी. सर्व विश्लेषकांनी उप्र मध्ये या लाटेला कसे सोडून दिले? ही लाट नव्हे सुनामी आहे. न की कुठल्याही तलावात उठलेली. समीक्षेमुळे सकारात्मक पर्यायाकडे जाण्याची गरज आहे.    
- उमर अब्दुल्ला
बातम्या आणखी आहेत...