आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांपासून ग्रामस्थांना होते पत्ते-जुगाराचे व्यसन; 24 वर्षीय युवतीने एका दिवसातच केले बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुरू (राजस्थान) - राजस्थानमधील सरदार शहर तालुक्यातील तोलासर गावातील रोलासरमध्ये सुमारे १५ वर्षांपासून पत्त्यांवर जुगार खेळण्याचे व्यसन लोकांना लागले होते. एका २४ वर्षीय सरपंच युवतीने ते एका दिवसातच बंद केले. बी. ए., बी.एड. केलेल्या परमेश्वरी गोदारा यांचा हा धाडसी निर्णय आज संपूर्ण गावासाठी आदर्श ठरला आहे. विशेष म्हणजे किशनलाल गोदारा या शेतकऱ्याच्या मुलीच्या पुढाकाराने गावात पत्ते खेळणाऱ्यांची घरे उद्ध्वस्त होण्यापासून बचावली. आता पत्ते खेळणारे लोक कामधंद्याला लागले आहेत. आधी ते दिवसभर गावाच्या चौकांत आणि इतरत्रही पत्ते खेळत होते. दररोज मारामाऱ्या होत असत.  

या लढाईच्या कहाणीची सुरुवात ५ ऑगस्ट २०१५ पासून सुरू झाली. त्या दिवशी सरपंच परमेश्वरी ग्रामपंचायतीची बैठक घेऊन परतत होत्या. रस्त्यात गावाच्या चौकात लोक पत्ते खेळत होते आणि आपसात भांडत होते. परमेश्वरीने तेथे थांबून सर्व दृश्य पाहिले. ते थांबवण्याचा निर्धार तिने केला. १० दिवसांनंतर १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर त्यांनी निर्णय ऐकवला. पत्ते खेळताना दिसल्यास ११०० रुपये दंड भरावा लागेल, अशी तंबीही दिली. आता त्याला १८ महिने उलटून गेले तरी एकही व्यक्ती पत्ते खेळताना आढळली नाही.   
 
मला खूप दु:ख होत होते, लाजही वाटत असे...  
सरपंच परमेश्वरी यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट २०१६ ला मी एका कार्यक्रमात म्हटले होते की, ‘आपल्याला लाज वाटायला हवी. गावातील चौकाचौकांत आणि गल्ल्यागल्ल्यांत आपल्याच गावातील लोक पत्ते-जुगार खेळत आहेत. त्यामुळे गावातील वातावरण खराब होत आहेच, शिवाय सर्व आपला वेळ वाया घालवत आहेत. माता-भगिनी कमावतात आणि तुम्ही पत्ते-जुगार खेळता. पत्ते खेळल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि भांडणे याशिवाय काही मिळत नाही. गावातील ही वाईट सवय आपण सर्वांनी एकत्रितपणे संपवण्याची गरज आहे.’
 
गावातील संपूर्ण परिस्थिती दर्शवणाऱ्या या चार गोष्टी आणि झालेले बदल   
१.तोलासर या गावाची लोकसंख्या सुमारे १५०० आहे. त्यात ८०० पुरुष आणि ७०० महिलांचा समावेश आहे. आधी २०० लोक पत्ते खेळत होते. आता तेच कामे करत आहेत.
२. दर दुसऱ्या दिवशी पत्त्यातील जय-पराजयामुळे भांडणे होत असत. त्यामुळे गावातील वातावरण बिघडलेले होते.  
३. पत्ते खेळणाऱ्या युवकांच्या माता-भगिनींना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावे लागत होते.   
४. पत्ते खेळण्याची सवय सुटली असून आता ते व्हॉलीबॉल खेळतात.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
\\
 
 
बातम्या आणखी आहेत...