आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी झेप घेण्यासाठी पुरुषांची भूमिका महत्त्वाची : मलाला युसूफझाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- महिलांच्या पंखांचे खच्चीकरण होऊ न देता पुरुषांनी महिलांना झेप घेऊ दिली पाहिजे. वडील किंवा भाऊ म्हणून पुरुषांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. स्वात खोऱ्यात स्वत:बद्दल बोलू शकणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य मुली आहेत. परंतु त्यांचे भाऊ व्यक्तीकरणात अडथळा ठरतात, अशी खंत १९ वर्षीय पाकिस्तानातील शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ती मलाला युसूफझाईने व्यक्त केली आहे.  

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरिस यांच्या हस्ते मलालास नुकताच ‘मेसेंजर ऑफ पीस’ प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी मलालाने पाकिस्तानसह जगभरातील मुलींच्या स्वातंत्र्य, शिक्षणावर आपले परखड मत मांडले. मलाला म्हणाली, माझे उदाहरण काहीसे वेगळे होते. कारण मला वडिलांनी कधीच अडथळा आणला नाही. त्यांनी मला बोलते व्हायला शिकवले. कुटुंबाने नेहमीच सोबत केली. प्रत्येक महिलेला असा पाठिंबा हवा असतो. महिलांना हवे ते करण्याचे स्वातंत्र्य देणारे पुरुष प्रत्येक कुटुंबात हवे. वडील, भाऊ म्हणून असा विचार करणारे पुरुष असायला हवेत.  

माझ्या वडिलांना मलालासाठी काय केले, असे विचारलेले आवडत नाही. ते म्हणतात तिच्यासाठी काय केले नाही, असा प्रश्न विचारायला हवा. पुरुषांनी पंख छाटण्याचे काम करू नये. 

विविध क्षेत्रांतील व्यक्तींची दखल
संयुक्त राष्ट्राच्या मेसेंजर्स ऑफ पीस हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, मनोरंजन, क्रीडा इत्यादी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. २०१२ मुलींनी शिक्षण घ्यावे, असा संदेश देणाऱ्या मलालास तालिबानींनी गोळीबार करून लक्ष्य केले होते.
बातम्या आणखी आहेत...