आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीवरील संशयावरून दोन मुलींसह चौघांचा खून, पोलिस ठाण्यात जाऊन दिली कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाडमेर (राजस्थान) - एक शिक्षक स्वत:च्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. तिचा काटा काढण्यासाठी गाढ झोपेत असलेल्या आई, पत्नी आणि दोन मुुलींचा त्याने खून केला. त्यानंतर गावापासून १५ किमी दूर अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणासर कलागाव येथील रहिवासी शिक्षक राणाराम बिष्णोई याने स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचून आपण आई, पत्नी आणि मुलींना ठार मारले आहे, असे सांगितले. त्याचे बोलणे ऐकताच ठाण्यातील कर्मचारीही हादरले. ते त्याला घरी घेऊन गेले असता त्यांची आई पार्वती (७०), पत्नी लालीदेवी (४०), दोन मुली देवी (१४) आणि संतोष (१२) यांचे मृतदेह पडलेले होते. त्यांच्या डोक्यावर काठीने जोराने प्रहार केलेले होते. राणाराम पत्नीवर संशय घेत होता. यामुळे तिला तो मारणार होता. तिला मारल्यानंतर या तिघांना कोण सांभाळेल? म्हण्ून तिघींचीही त्याने हत्या केली.

कायमची चिरनिद्रा
आई, पत्नी आणि दोन मुली रात्री २ च्या सुमारास गाढ झोपेत होत्या. रात्री २ वाजता पहिली लाठी त्याने पत्नीवर चालवली. त्या वेळी एक मुलगी जागी झाली. ती पळून जात होती. तिचा त्याने पाठलाग करून तिलाही मारून टाकले. छप्पराजवळ आई झोपलेली होती. तिलाही त्याने मारले. दुसऱ्या दिवशी तो पाेलिसात पोहचला
बातम्या आणखी आहेत...