आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू विक्रेत्यांवर आली संक्रांत, अनेक राज्यांत दारूच्या दुकानांना विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातात लाठ्या-काठ्या घेऊन या महिलांनी दुर्गावतार धारण केला आहे. - Divya Marathi
हातात लाठ्या-काठ्या घेऊन या महिलांनी दुर्गावतार धारण केला आहे.
भोपाळ, जयपूर  - राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांत दारूची दुकाने उघडण्यास महिलांनी तीव्र विरोध दर्शवला असून दारूची दुकाने बंद करण्यास मोठ्या प्रमाणावर महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात दारूच्या दुकानांचा लिलाव होतो.  दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभाग नव्या दुकानांना परवानगी देते, तर उत्पन्न न देणारी दुकाने बंद केली जातात.

या धोरणांच्या विरोधात नवी दुकाने उघडण्याच्या विरोधात महिलांनी आघाडी घेतली आहे. अनेक शहरांत या मोहिमेस आंदाेलनाचे स्वरूप आले असून हातातील कामे सोडून दारूची दुकाने बंद करण्यासाठी महिलाच आता पुढे सरसावल्या आहेत. अनेक भागांत त्यांच्या मोहिमेस यश मिळाले असून काही भागांत दारू विक्रेत्याविरोधात त्यांची लढाई सुरू आहे.  
 
हिमाचलमध्ये १६ महामार्गांचे जिल्हा मार्गात रूपांतर  :  हिमाचल प्रदेशात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पळवाट शोधली असून १६ महामार्गांचे रूपांतर जिल्हा मार्गात केले आहे. यामुळे येथे दारूची दुकाने सुरू राहू शकतात.  
 
महिलांचा ठिय्या  
चिडावा - राजस्थानातील चिडावा गावातील एका वॉर्डात दारूच्या दुकानास लोकांचा विरोध कायम आहे. लोकांनी दिवस-रात्र पहारा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १५ येथील स्टेशन रोडवर राहणाऱ्या महिलांनी  या भागातील दारूचे दुकान उघडू नये म्हणून रात्रीसुद्धा पहारा देणे सुरू केले आहे.
 
विरोधात पत्नीसुद्धा  
दतिया - येथील एका दुकानमालकाने दहा हजार रुपये दरमहा मिळतात म्हणून  दारूच्या दुकानासाठी जागा भाड्याने दिली. त्याच्या बायकोलाच हा निर्णय पटला नाही. तिने आजूबाजूच्या महिलांना एकत्र करून दुुकानावर हल्ला केला. महिलांनी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या, तर फ्रिजरही उलथवून टाकला व दुकानाची नासधूस केली. 
 
दारूच्या दुकानांची महिलांकडून तोडफोड  
बुऱ्हाणपूर - दारूची दुकाने हटवण्यासाठी राजीवनगरात गुरुवारी दुपारी या भागातील महिला आक्रमक झाल्या. दोन दिवसांपूर्वी येथे महिला आणि पोलिसांमध्ये आपसात बाचाबाची, मारहाण व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. वातावरण बिघडत चालल्याचे पाहून पोलिसांनी दारूच्या दुकानांना कुलूप ठोकले. दुकाने पुन्हा उघडली तर जाळून टाकण्याचा इशारा महिलांनी दिला होता. तसा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. तेथून परतत असताना दारूचे दुकान उघडे दिसले. तेव्हा महिला व तरुणांनी या दुकानावर दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...