आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन कोळींचे पार्थिव आज सांगलीत येणार, संपूर्ण दुधगावमध्ये यंदा साजरी होणार नाही दिवाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - एलओसीवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या एका शूरवीराचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील आणि मिरज दुधगावचे नितीन कोळी या हल्ल्यात शहीद झाले आहे. जम्मू काश्मिरमध्ये दोन्ही जवानांला आज सलामी देण्यात आली. आज नितीन यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणले जाणार आहे.

संपूर्ण गावावर शोककळा
नितीन सुभाष कोळी यांना वीरमरण आल्याने मृत्यूमुळे संपूर्ण दुधगावावर शोकळा पसरली आहे. हा केवळ कोळी कुटुंबीयांसाठी नव्हे तर संपूर्ण दुधगावसाठी दुःखाचा क्षण असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. ऐन दिवाळीत कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. दुधगावमध्ये या दुःखद घटनेमुळे यंदा दिवाळीच साजरी केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोळी यांच्या अंत्यविधीपर्यंत गाव पूर्णपणे बंद राहणार आहे. कोणीही फटाके फोडणार नाही की, लक्ष्मीपूजनही करणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे. गावचा बाजारही या घटनेमुळे रद्द करण्यात आला आहे. नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने 15 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

पुढे वाचा, शहीद झालेले दुसरे जवान मनदीप यांची करुण कहाणी...
बातम्या आणखी आहेत...