आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागावाटपात सन्मान द्या, तरच आघाडी; विधानसभा-लोकसभेसाठी बसपची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- जातीयवादी पक्षांना पराभूत करण्यासाठी बसप लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडीस तयार आहे. परंतु आम्हाला जागावाटपात योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे, असे मायावती यांनी म्हटले आहे.  


गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी पक्ष नेते सतीश मिश्रा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली होती. परंतु त्यातून अपेक्षित सहमती होऊ शकली नाही. विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु जागावाटपात योग्य तो सन्मान मात्र दिला जायला हवा. 
बसप प्रमुखांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा मायावतींनी दिला आहे.  बसपने गुजरातमध्ये २५ जागा मागितल्या होत्या. परंतु काँग्रेसने त्याबाबत तयारी दर्शवली नाही. हिमाचल प्रदेशात १० जागी उमेदवार उभा करण्याची बसपची योजना होती. परंतु काँग्रेसने बसपाच्या दोन्ही प्रस्तावांना स्वीकारले नाही.  

 

आघाडीचा पूर्वीचा अनुभव वाईट

खरे तर आघाडीबाबतच्या अलीकडच्या प्रयत्नात समाजवादी पार्टीकडून आलेला अनुभव फारसा चांगला नव्हता. पक्षाला २००७ मधील आघाडीमुळे फायदा झाला नाही. अखेर तेव्हा स्वबळावरच निवडणूक लढवावी लागली होती. आताही तोच मार्ग दिसतो. कोणत्याही पक्षाने जागावाटपात सन्मानजनक वागणूक दिली नाही तर स्वबळावर निवडणूक लढवलेली बरी, असे मायावती यांनी स्पष्ट केले. त्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

‘जनकल्याणकारी दिवस’  म्हणून साजरा होणार जन्मदिन  
१५ जानेवारी हा बसपप्रमुख मायावती यांचा जन्मदिन आहे. गेल्या काही वर्षांपासून तो जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा पक्षात सुरू करण्यात आली आहे. यंदाही या संकल्पनेवर आधारित वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन मायावती यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. पक्ष बळकट करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.  


संकल्पपत्रातून भाजपची धूळफेक

भाजपने शहरातील स्थानिक निवडणुकांत संकल्पपत्र जाहीर केले आहे. परंतु खरे तर भाजपचे सरकार आपल्याच आश्वासनांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे संकल्पपत्र जाहीर करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.  

 

घराणेशाहीचा प्रश्नच नाही  
 बसपमध्ये घराणेशाही मुळीच नाही. पक्षाचा पाया तसा नाही. त्यामुळे भावाला किंवा पुतण्याला बसपमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असा प्रसारमाध्यमांचा कयास पूर्णपणे खोटा आहे. काँग्रेस व सपामध्ये हे घडते. बसपामध्ये परिपक्व नेतृत्वाला संधी दिली जाते, असे मायावती यांनी सांगून घराणेशाहीचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.  

बातम्या आणखी आहेत...