आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशांच्या पोळापासून टीबीचे औषध शोधले, छत्तीसगडच्या दोन संशोधकांनी मध केले संशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निशा साहू - Divya Marathi
निशा साहू
विलासपूर- गुरू घासीदास सेंट्रल विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक निशा साहू यांनी मधमाशांच्या पोळापासून आणि जावेद अहमद मलिकने निळेच्या रोपावर संशोधन करून क्षयरोगाचे आैषध शोधले.  या औषधामुळे क्षयरोगावर घेतलेल्या औषधाचे  यकृत आणि शरीराच्या इतर भागांवर होणारे दुुष्परिणाम दूर होतील, असा यांचा दावा आहे. याचा प्रयोग त्यांनी उंदरावर केला असून क्षयरोगावरील औषधांचे साइड इफेक्ट्स टाळले जातील. शिवाय रुग्णाला लवकर रोगमुक्तही करेल. या संशोधनासाठी ७ व ८ डिसेंबर २०१६ रोजी इंटरनॅशनल यंग सायंटिस्ट अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले आहे.  गुरू घासीदास सेंट्रल विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागात डाॅ. माेनिका भदोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन संशोधक  पीएचडी करत आहेत.
 
टीबीच्या औषधाचा वापर केल्याने त्याच्या दुष्परिणामांची या दोघांनाही योग्य कल्पना आली होती. त्यामुळे ते व्यथित झालेले होते. यासाठीच त्यांनी या औषधांवर संशोधन करण्याचे ठरवले. मधमाशांच्या पोळातून निघालेला (प्रोप्रालिस) चोथा काढून त्याला १०० अंश सेल्सियस तापमानावर ठेवले. त्यानंतर मुख्य प्रोपालिस वेगळा केला जातो. त्यानंतर ७० अंश सेल्सियसवर अल्कोहोल एक्स्ट्रॅक्शन केले जाते. ते सॉलिड फॉर्ममध्ये मिळते. अशा प्रकारे जावेद अहमद मलिक गुरू घासीदास सेंट्रल विद्यापीठात असलेल्या निळेच्या रोपावर संशोधन करत आहेत.  
टीबीच्या औषधाचा यकृत व किडनीवर दुष्परिणाम नाही. निशा आणि जावेद यांचा दावा असा की, त्यांनी बनवलेल्या औषधांचा वापर टीबीच्या औषधाबरोबर केला तर टीबीचा आजार लवकर दूर होईल. अशा प्रकारचे औषध शरीराच्या कोणत्याही भागावर दुष्परिणाम करत नाही.

इंटरनॅशनल यग सायंटिस्ट अवॉर्ड
पुण्यात ७ व ८ डिसेंबर रोजी इंटरनॅशनल सायन्स कम्युनिटीद्वारा आयोजित परिषदेत विलासपूरमधून निशा आणि जावेद यांनी सहभाग घेतला. यात श्रीलंका, जपान व नायजेरियासह अन्य देशांतील सुमारे ४०० युवा वैज्ञानिकांनी सहभाग घेतला. यात निशा आणि जावेद यांनी ही उपचारपद्धती सादर केली. याचे खूप कौतुक झाले. त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्डसाठी सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू अंजली गुप्ता यांनी अभिनंदन केले.
बातम्या आणखी आहेत...