आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपाल-अखिलेशमध्ये मुलायमांदेखत धक्काबुक्की; समेटासाठीच्या महाबैठकीतच वादंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या कुटुंबातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी बाेलावण्यात आलेली महाबैठक वादावादी, धक्काबुक्कीने संपली. पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यादेखत मुख्यमंत्री अखिलेश आणि त्यांचे काका शिवपाल यांनी वाद घातले. त्यानंतर अखिलेश यांना मुलायम म्हणाले, शिवपाल तुझे काका आहेत. त्यांची गळाभेट घे. त्यावर दोघांनी भेटही घेतली. यादरम्यान मुलायम यांनी मंचावर आमदार मुस्लिम नेते आशू मलिक यांना बोलावले. त्यावर अखिलेश संतापले.

मलिक यांना धक्का देत माइक हातात घेऊन अखिलेश म्हणाले, या व्यक्तीने अमरसिंह यांच्या इशाऱ्यावर कट रचला. त्याने अमरसिंहांच्या सांगण्यावरून एका इंग्रजी वृत्तपत्रात पत्र छापून आणले. त्यात मला औरंगजेब ठरवले. यानंतर शिवपाल हे अखिलेश यांच्याजवळ आले. दोघांत धक्काबुक्की झाली. शिवपाल यांनी माइक हिसकावून घेतला. नंतर मुलायम अखिलेश बाहेर गेले. त्यातच अखिलेश समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत मुलायम यांच्या घरी दोघांत समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू होता.

अखिलेश नवा पक्ष काढू इच्छित आहे. माझ्या एकुलत्या मुलाची शपथ घेऊन हे मी सांगतो. मी गंगाजल हातात घेण्यास तयार आहे. मुख्यमंत्री पक्ष कसा चालवायचा हे मी जाणतो. मायावतींच्या अप्रामाणिक सरकारविरुद्ध आम्ही लढलो होताे. आता नेताजींनी उत्तर प्रदेशचे नेतृत्व स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असे शिवपाल यांनी म्हटले.

हवे तर नेताजी मला पक्षातून काढू शकतात. लोकांना वाटते नवा पक्ष स्थापन होईल. पक्ष कोण काढतोय? मला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यावर अमरसिंह तुमच्याकडे तास बसले. त्यांनी गेल्या वर्षी टि्वट केले होते की, सपामध्ये बदल होऊन नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री बदलेल. हे माझे करिअर आहे. राजकारण सोडून मी कुठे जाईन, असा प्रश्न अखिलेश यांनी केला.
पुढील स्लाइड्सवर वाचा अखिलेश आणि शिवपाल काय म्हणाले..
बातम्या आणखी आहेत...