मथुरा - उत्तर प्रदेशात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. मथुरेत राष्ट्रीय लोकदलाच्या जाहीर सभेत हरियाणातील नर्तकींनी ठुमके लगावले. त्यांच्या नाचावर लोकांनी नोटा उधळल्या. रविवारी रालोदच्या कुंवर नरेंद्रसिंग यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. गोवर्धन तालुक्यातील मगोर्रा भागात आयोजित सभेत गर्दी जमवण्यासाठी हरियाणवी लोकगायक आणि नर्तकी बोलावण्यात आल्या होत्या.