आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दहशतवाद निर्मूलनासाठी मानवी दृष्टिकोन गरजेचा’; मारून समस्या सुटणार नाही : मुफ्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कठुआ- दहशतवाद्यांना फक्त ठार मारून दहशतवादाचे उच्चाटन होणार नाही, तर ही समस्या सोडवण्यासाठी आणखी मानवीय दृष्टिकोन अवलंबण्याची गरज आहे, असे मत जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी व्यक्त केले.


पोलिस प्रशिक्षण शाळेत आयोजित कार्यक्रमात मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘काश्मीरमधील दहशतवाद संपवावाच लागेल, पण फक्त दहशतवाद्यांना ठार मारूनच दहशतवादाचे उच्चाटन होणार नाही. दहशतवादामागील खरी समस्या आणि कारण आपल्याला समजून घ्यावे लागेल.’ दहशतवादाशी लढताना ‘सौम्य’दृष्टिकोन अवलंबावा लागेल असे सांगताना त्यांनी, काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हा मागे घेण्याच्या आपल्या सरकारच्या अलीकडच्या निर्णयाचा उल्लेख केला. पोलिसांना या मुलांचे समुपदेशन करावे लागेल. मी अलीकडेच पेलेट गनचे बळी ठरलेल्यांना माझ्या निवासस्थानी निमंत्रण दिले होते. त्यापैकी बहुतांश जण १४ ते १६ वर्षे या वयोगटातील आहेत हे एेकून मला खूपच आश्चर्य वाटले.
काश्मीर खोऱ्यात अमली पदार्थांचे सेवन आणि महिलांच्या विरोधातील हिंसाचार ही दहशतवादानंतरची मोठी आव्हाने आहेत, असे नमूद करून मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, अंमली पदार्थांचे व्यसन सुटावे यासाठी श्रीनगरमधील पोलिसांतर्फे चालवली जाणारी केंद्रे चांगले काम करत आहेत. 


महिलांविरोधातील गुन्ह्यांचा आलेख वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाल्या की, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला तक्रारी नोंदवण्यासाठी समोर येत नाहीत हे दुर्दैव आहे. महिला कायदेशीर मदत मागत नाहीत याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे कौटुंबिक प्रकरणाची जाहीर वाच्यता करण्याची त्यांची इच्छा नसते आणि महिलांचा पोलिसांवर विश्वास नाही हे दुसरे कारण. महिलांनी आपल्या समस्या खुलेपणाने सांगाव्यात यासाठी महिला पोलिस ठाण्यांची स्थापना केली आहे. अशा ठाण्यांत पुरेशी कर्मचारी संख्या नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी पुढे येऊन अशा पीडित महिलांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...