आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे पाठीवरील आेझे पुढील वर्षीपासून कमी होणार : प्रकाश जावडेकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नीमच- विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे आेझे कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून लवकरच त्यासाठी योजना आणली जाईल. सध्या सुरू असलेले शाळांचे डिजिटायझेशन विद्यार्थ्यांना आेझ्यातून मुक्त करणारे ठरेल, अशी ग्वाही मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
 
केंद्र सरकारने शाळांमध्ये डिजिटल फलकाची कल्पना राबवत आहे. प्रोजेक्टर, सॉफ्टवेअरचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील आेझे कमी होण्यास मदत होणार आहे. डिजिटल फलक व प्रोजेक्टर असलेल्या शाळांना त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर मिळू शकेल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. जावडेकर यांच्या हस्ते मंगळवारी मध्य प्रदेशातील जावाड तालुक्यातील २० हायटेक शाळांचे उदघाटन पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते. जावाडमधील या शाळांतील विद्यार्थ्यांना एलसीडी स्क्रिन व प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्ययन करण्याची संधी मिळणार आहे. या शाळांतील शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाचे योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
१० कोटी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन
देशात सात लाख शिक्षक असून ते सुमारे २६ कोटी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतात. पहिलीपासून बारावीपर्यंत देशात १५ लाख शाळा आहेत. त्यापैकी १० कोटी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळतो. सरकार त्याची कक्षा वाढवत आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...