आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएमकेची सर्व सूत्रे आता एम.के. स्टॅलिनकडे, प्रथमच कार्यकारी प्रमुखाचे पद निर्माण केले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- डीमकेचे सर्वेसर्वा  एम. करुणानिधी यांनी पार्टीची सर्व सूत्रे त्यांचे पुत्र एम.के. स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केली. ते  डीएमकेचे कार्यकारी प्रमुख असतील, असे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. आता ६३ वर्षीय स्टॅलिन यांच्याकडे सर्व निर्णयांचे अधिकार आले आहेत. पार्टीच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९३ वर्षीय करुणानिधी यांच्या प्रकृतीची परिस्थिती पाहता हा निर्णय अत्यावश्यक असल्याचे पार्टी सूत्रांनी सांगितले. गेल्या ५० वर्षांत प्रथमच करुणानिधींच्या अनुपस्थितीत पार्टीची सर्वसाधारण सभा झाली. डीएमकेच्या ६० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात प्रथमच कार्यकारी प्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.  स्टॅलिन हे माजी उपमुख्यमंत्री आहेत. एआयएडीएमकेच्या प्रमुखपदी शशिकला नटराजन यांची निवड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव के.अनबाझगन यांनी स्टॅलिन यांचे प्रमुखपदासाठी नाव सुचवले. स्टॅलिन यांच्या नावाची घोषणा होताच पार्टी मुख्यालयाबाहेर व आतषबाजी करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...