आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi, Nitish Kumar Bonhomie Is Reflection Of 'Team India': BJP

"मोदी-नितीशकुमार यांचा गोडवा टीम इंडियाचे प्रतिबिंब '

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील गोडवा हा ‘टीम इंडिया’ चे प्रतिबिंब आहे. बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल हेच यातून दिसले, असे भाजपच्या वतीने रविवारी स्पष्ट करण्यात आले.

भाजप निकोप स्पर्धेवर विश्वास ठेवते. म्हणूनच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी टीम इंडियासारखे एकत्र येऊन राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्यात शनिवारच्या कार्यक्रमात दिसून आलेला गोडवा हा त्याचेच प्रतिबिंब होता, असे पक्षाचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी म्हटले आहे. दक्षिणेकडील असो की उत्तरेकडील, प्रत्येक खेळाडू हा संघाचाच एक भाग असतो. त्यांना एका उद्दिष्टाने खेळायचे असते, असे हुसेन म्हणाले.

दीघा-सोनेपूर रेल्वे मार्ग पुलाचे उद्घाटन शनिवारी मोदी यांच्या उपस्थितीत पार पडले. या समारंभाला मुख्यमंत्री नितीश कुमारही हजर होते. दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने हा राजकीय चर्चेचा विषय ठरला होता.