आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोरारी बापूंच्या कथेतून प्रेरणा घेऊन स्मशानातच केले लग्न; सरणाभोवती घेतले फेरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महुवा (भावनगर)- जन्म व मृत्यूचा उत्सव स्मशानभूमीत साजरा केला जावा, अशी शिकवण बनारसमधील प्रवचनात मोरारी बापू यांनी दिली होती. यापासून प्रेरणा घेत गुजरातच्या भावनगर जिल्ह्याच्या महुवातील एका पुजाऱ्याच्या मुलाने स्मशानातच लग्न केले. वर घनश्याम दास व वधू पारूलने रविवारी सरणाभोवती फेरे घेतले. लग्न लावण्यासाठी कोणी पुजारी येण्यास तयार नव्हता त्यामुळे मोरारी बापू स्वत: स्मशानात पोहोचले. पंडिताची व्यवस्था केली. वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी विवाह लावून दिला. घनश्याम म्हणाला, स्मशानभूमी ही पवित्र जागा असल्याचे बापूंनी सांगितले होते. त्याच वेळी स्मशानात लग्न करायचे ठरवले होते. 

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, स्मशानभूमी अतिपवित्र, येथे सामूहिक विवाह होतील...

बातम्या आणखी आहेत...