आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवर रडले होते मुलायम, अजितसिंगाच्या मुलाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा- त्यांना समाजवादी पक्षाशी आघाडी हवी होती,कारण मुलायमसिंग फोनवर रडले होते. सपा आणि काँग्रेसने आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असे मुलायमसिंगांना वाटते, अशी माहिती राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजितसिंग यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांनी दिली.

ते म्हणाले, जर तुमचा मुलगा रडत असेल आणि मदतीची याचना करत असेल तर तुम्ही त्याला मदत करणार नाही का? चौधरी साहेब ( अजितसिंगांनी ) चुकीचे काहीच केलेले नाही. त्यांनी सपाशी आघाडी करण्याचा निर्णय दोन मिनिटात घेतला होता. अखिलेशबाबत बोलताना त्यांनी सांगितले, ६०० मीटरसाठी मेट्रो रेल्वे चालवणे म्हणजे विकास नव्हे.

आधी भाऊ नंतर मुलगा 
लखनऊ- समाजवादी पक्षाचे मार्गदर्शक मुलायमसिंग यादव यांनी म्हटले, मी ९ फेब्रुवारीपासून जसवंतनगरमधून शिवपाल यादव याच्यासाठी प्रचार सुरू करणार आहे. सपाचा प्रचार कोण करतो आणि कोण नाही? याने काही फरक पडत नाही, असे  रामगोपाल यादव यांनी मुलायम यांच्यावर टिपणी करताना म्हटले होते.