आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम मृत्युपत्राद्वारे ठरवणार वारसदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - कौटुंबिक वादाला कंटाळून मुलायमसिंह यादव यांनी मृत्युपत्र लिहून वारसदारांची भूमिका ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना खास वर्तुळातील लोकांशी चर्चा केली असल्याचे समजते. या मृत्युपत्रात अखिलेश  व प्रतीक यादवची भूमिका ठरवणार आहेत. अखिलेश पहिली पत्नी मालती व प्रतीक साधना गुप्ता यांचे चिरंजीव आहेत. प्रतीक राजकारणापासून दूर अाहे. मात्र प्रतीकची पत्नी अपर्णासिंग यादव यांना  लखनऊच्या कँट जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची भांडणे पाहून मुलायमसिंहांना मृत्युपत्र लिहिण्याची गरज भासू लागली आहे.
 
राज्याच्या राजकारणात २५ वर्षांपेक्षाही अधिक काळ पक्षात दबदबा ठेवून असलेल्या मुलायमसिंह पक्षांतर्गत वाढते वाद पाहून अस्वस्थ झाले आहेत. तडजोड करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पक्ष आणि  चिन्हाचा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेल्याने त्यांना धक्का बसला. २०१२ मध्ये ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असूनही अखिलेश यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. सरकार चालवण्यात अखिलेशला साह्य केले. आता समाजवादी पक्षात फूट अटळ आहे. निवडणूक आयोग मुलायमसिंहांची बाजू एेकून घेतल्यानंतर निर्णय देईल. मुलायम मुलांपेक्षा भाऊ रामगोपालवर जास्त नाराज आहेत. रामगोपाल अखिलेशचे वाटोळे करत आहे, असे त्यांचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...