आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. जेलियांग यांचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोहिमा -   नागालँड या आणखी एका ईशान्येकडील राज्यात भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सरकारच्या विरोधात असंतोष असल्याने मुख्यमंत्री टी. आर. जेलियांग यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी रविवारी त्यांचा राजीनामा मंजूर केला. नागालँड पीपल्स फ्रंटचे निलंबित खासदार नेफिऊ रिओ हे पुढील मुख्यमंत्री असू शकतात. सत्ताधारी डेमॉक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालँडच्या ५० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. 
 
नेफिऊ यांच्या नेतृत्वात हे आमदार भाजपत जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर जेलियांग यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले होते. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला वेग आला होता.
 
बिघडलेली स्थिती पाहून केंद्र सरकारने राज्यपाल पी. बी. आचार्य यांच्यासह जेलियांग आणि रिओ यांना काही दिवसांपूर्वी पाचारण केले होते. तेथे पेच सोडवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतरच जेलियांग यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...