आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदैवाने तेव्हा आयआयएम एंट्रन्स दिली नाही, एखाद्या साबण कंपनीत मॅनेजर राहिलो असतो: नंदन निलेकणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि यूआयडीएआयचे माजी अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी म्हटले आहे की, आयआयएमच्या प्रवेशपूर्व परीक्षेत सहभागी न हाेऊ शकणे, हे माझे सुदैवच आहे. मला नोकरी हवी होती. याच संदर्भात माझी भेट नारायण मूर्ती यांच्याशी झाली. यानंतर अामचे स्नेह जुळले. मंगळवारी बंगळुरूत सीआयआयकडून आयोजित कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दांत...

‘आयआयएमच्या एंट्रन्स परीक्षेत सहभागी झालो नाही, हे माझे सुदैवच आहे. जर माझी त्यात निवड झाली असती तर आज मी एखाद्या साबण किंवा इतर कंपनीत व्यवस्थापकाच्या भूमिकेत असतो. नोकरीच्या शोधात मी एका छोट्या कंपनीत गेलो. जेथे नारायणमूर्ती यांनी मला संधी दिली. अाम्ही मिळून इन्फोसिसचा पाया रचला. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. काही वर्षांनी इन्फोसिसनेही एंट्रन्स परीक्षा सुरू केली होती. म्हणजे काही वर्षांनी आलो असतो तर मलाही इन्फोसिसमध्ये जागा मिळाली नसती. आयआयटी मुंबईतील शिक्षण माझ्यासाठी निर्णायक ठरले. तेथील अनुभवांनी मला लीडर होण्यात मोठी मदत केली. मी एक साधारण मुलगा होतो. मात्र, आयआयटीत गेल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. मोठ्या शहरांतील मित्रांसोबत शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावला. यामुळेच माझ्यातील नेतृत्वगुण विकसित होत गेले.  

देशात रोजगारवाढीच्या मुद्द्यावर मला वाटते की, जीएसटीच्या माध्यमातून डिजिटल फुटप्रिंट्स उपलब्ध होत आहेत. यामुळे कंपन्यांना प्रचंड डाटा मिळतोय. जीएसटीतील ८० लाख लहान व्यवसाय आता कर्ज घेण्यास सुरुवात करतील. यामुळे त्यांची वाढ व भरभराट होईल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. छोटे व्यवसाय डाटाच्या कमतरतेमुळे कर्जे घेऊ शकत नव्हते. बिग डाटा यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे रोजगाराच्या समस्येवरही तोडगा निघू शकतो. आता प्रायव्हसीसाठी पायाभूत आराखडा उभारण्याची गरज आहे. बहुतांश लोक मोबाइलवरून बिग डाटाचा वापर करत आहेत. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली डाटा प्रोटेक्शन समिती स्थापली आहे. जी डाटाची गोपनीयता, सुरक्षा व मालकीच्या मुद्द्यांवर लक्ष देत आहे. तिच्या अहवालाची देशाला प्रतीक्षा आहे.’
बातम्या आणखी आहेत...