आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक वर्ष बदलणारे पहिले राज्य ठरले ‘एमपी’, मोदींचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ  - इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली आर्थिक वर्षाची परंपरा बदलणारे मध्य प्रदेश पहिले राज्य ठरले आहे. आता मध्य प्रदेशमध्ये आर्थिक वर्ष एक जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान राहील. हा निर्णय पुढील आर्थिक वर्षापासून लागू होईल. म्हणजेच राज्याचे पुढील आर्थिक वर्ष एक एप्रिल २०१८ ऐवजी एक जानेवारी २०१८ रोजी सुरू होणार आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार एक एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत आर्थिक वर्ष धरले जाते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहानुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. बैठकीनंतर मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संबंधीची माहिती दिली. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष तीन महिने आधीच संपणार आहे.  नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, “आर्थिक वर्षाचा कालावधी बदलण्याचा निर्णय वर्ष २०१८ पासून लागू होईल. म्हणजेच २०१७-१८ हे आर्थिक वर्ष तीन महिने आधीच संपवण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींनुसार सर्व खर्च डिसेंबरपर्यंत करण्याचा सरकार प्रयत्न करणार अाहे. राज्य सरकारचा पुढील अर्थसंकल्प याच वर्षी डिसेंबर महिन्यात किंवा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सादर करण्यात येणार आहे.’  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...