आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर विधानसभेत राष्ट्रगीताच्या वेळी गोंधळ, राज्यपाल एन. एन. व्होरा यांना अभिभाषण वाचणेही झाले अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- शीतकालीन राजधानी जम्मूमध्ये बजेट सत्राच्या पहिल्या दिवशीच विरोधी बाकावर बसलेल्या नॅशनल काॅन्फरन्स आणि काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रगीत सुरू असूनही काश्मीरमधील हिसेंविरुद्ध टीका सुरू केली. राष्ट्रगीताच्या वेळीच गोंधळ घातला. अर्धे राष्ट्रगीत वाजल्यानंतर दोन्ही पक्षांचे आमदार शांत झाले. राज्यपालांनी अशा गोंधळातच अभिभाषण वाचन सुरू केले. मात्र गोंगाटामुळे शेवटच्या आेळी वाचून अभिभाषण समाप्त केले. राज्यपाल परत जात असताना दुसऱ्यांदा राष्ट्रगीत वाजवले गेले. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. बाकांवर चढून गोंधळ घातला. विधानसभा व विधान परिषदेत श्रद्धांजली प्रस्तावाच्या दरम्यान नॅशनल काॅन्फरन्स आणि काँग्रेसने विरोध केला व वॉकआऊट केले.
  
सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त सत्रात अभिभाषण केले. नॅशनल काॅन्फरन्सचे आमदार मोहम्मद अकबर लोन आणि पीडीपी आमदारांदरम्यान काश्मीरमधील हिंसेवरून वादावादी झाली. राज्यपालांनी अभिभाषण वाचन सुरू केले. विरोधकांनी घोषणा लिहिलेले फलक फाडून राज्यपालांच्या दिशेने भिरकावले. अद्याप राज्यपालांनी काही आेळीच वाचल्या होत्या. घोषणांमुळे त्यांनी भाषण थांबवले. पुन्हा बोलणे सुरू करताना भाषणाच्या शेवटच्या आेळी वाचून त्यांनी अभिभाषण आवरते घेतले. राज्यपाल जाताच पुन्हा राष्ट्रगीत वाजू लागले. तेव्हा विरोधकांनी बाकावर चढून घोषणाबाजी सुरू ठेवली. खुनी सरकार, पीडीपी-बीजेपी सरकार हाय हाय, आरएसएस सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी सुरू होती. अपक्ष आमदार इंजिनिअर राशीद यांनी जनमत चाचणीचा आग्रह धरला.

आवाज कमी होता : जोरा
काँग्रेसचे नेता नवांग रिंंगजिन जोरा यांनी म्हटले की, राष्ट्रगीत वाजताना त्याचा आवाज खूप कमी होता. गोंगाटामुळे तो ऐकू आला नाही. ही सरकारची चूक आहे. राष्ट्रगीताचा आवाज कमी का ठेवण्यात आला यावर त्यांनी खुलासा करावा.
बातम्या आणखी आहेत...