आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीन 800 मुलींसाठी जिद्दीने उघडली शाळा, वैद्याच्या निष्काळजीपणामुळे दृष्टी गेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - दृष्टिहीन मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल ७१ वर्षीय जी.आर. पटेल यांना २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री विजय सांपला यांनी सन्मानित केले.  पटेल स्वत: अंध आहेत. 

राष्ट्रीय दृष्टिहीन संघानुसार, ३२ वर्षांत ८०० पेक्षा जास्त दृष्टिहीन मुलींचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. अंध असल्यामुळे या मुली शाळेत जाण्यास धजावत नव्हत्या. त्यांचे कुटुंब शिकवण्यास तयार नव्हते. १९८४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांनीही त्यंाचा याच कामासाठी गौरव केला होता. अापल्या कार्याची माहिती देताना पटेल म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा संपूर्ण बस्तरमधील अंध मुलांची गणना करण्याचे काम हाती घेतले होते. त्यात २१६ मुली आढळल्या. यानंतर ७० जणींना शाळा प्रवेश देण्यात आला. अजमेरचे रहिवासी पटेल २००८ मध्ये बिलासपूरच्या दृष्टिहीन कन्या विद्यालयाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. यानंतरही ते या क्षेत्रात प्रयत्नरत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...