आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक राज्यात उघडणार ‘एनसीईआरटी’च्या शिक्षण संस्था, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर- नजीकच्या काळात देशाच्या प्रत्येक राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) विभागीय शिक्षण संस्था सुरू केल्या जातील, अशी माहिती परिषदेचे संचालक प्रा. हृषीकेश सेनापती यांनी शनिवारी दिली. त्यांनी सांगितले की, नव्या प्रकल्पांतर्गत देशातील सहावी विभागीय संस्था आगामी सत्रापासून आंध्र प्रदेशच्या वेल्लोर जिल्ह्यात सुरू होत आहे. तेथे नव्या सत्रात सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाऊ शकेल.  

प्रा. सेनापती यांनी सांगितले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार, एनसीईआरटी आता प्रत्येक राज्यात विभागीय शिक्षण संस्था सुरू करण्याची तयारी करत आहे. सध्या अजमेरव्यतिरिक्त भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथे या संस्था सुरू आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या नव्या विभागीय शिक्षण संस्थेला मंजुरी दिलेली आहे. तेथे २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. विशेषत: बीए, बीएड आणि बीएस्सी., बीएडचे अभ्यासक्रम येथे सुरू केले जातील. एनसीईआरटी येथे सुरुवातीस २ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देईल. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असेल. ही संस्था सुरू झाल्यावर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आजूबाजूच्या राज्यांना विशेषत्वाने लाभ मिळू शकेल.  

पब्लिक स्कूलमध्ये पाठ्यपुस्तकांची कुठलीही कमतरता नाही
प्रा. सेनापती म्हणाले की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित शाळांसाठी २०१७-१८ या नव्या शैक्षणिक सत्राच्या इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंत कोणत्याही पाठ्यपुस्तकांची कमतरता नाही. एनसीईआरटीने प्रथमच पुस्तकांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एनसीईआरटीतर्फे अजमेरसह देशाच्या ९ शहरांत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी विक्री काउंटर उघडले जातील. देशभरात एनसीईआरटीच्या ६८० वितरण केंद्रांतून शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक संबंधित इयत्तेची पाठ्यपुस्तके मिळवू शकतील. एनसीईआरटीतर्फे अजमेर, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, कोलकाता, म्हैसूर, शिलाँग आणि दिल्लीत विक्री काउंटर उघडले आहेत. तेथून विद्यार्थी पाठ्यपुस्तके घेऊ शकतील.

प्रत्येक राज्यात सुरू करायच्या संस्था  
प्रा. सेनापतींनी सांगितले की, संपूर्ण देशात अशा प्रकारच्या संस्था उघडणे हे एनसीईआरटीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून आपापल्या राज्यांत विभागीय शिक्षण संस्था उघडण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकार याप्रकरणी संपूर्ण सहकार्य करेल. शिक्षण सचिवांशीही याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे.

१४ राज्यांत एनसीईआरटीची पुस्तके
प्रा. सेनापती म्हणाले की, सध्या सीबीएसई शाळांव्यतिरिक्त १४ राज्यांची शिक्षण मंडळेही अभ्यासक्रमात व्यग्र आहेत. तामिळनाडू आणि गुजरातही या राज्यांत समाविष्ट आहेत.
बातम्या आणखी आहेत...