आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोहित आले नसल्याने विवाहासाठी नेटची मदत; मध्य प्रदेशातील पिपरई येथील प्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिपरई- वर-वधू पक्षाकडून लग्नाची सर्व तयारी तर झाली, पण पुरोहितच आले नाहीत. आजूबाजूच्या परिसरात सात फेरे पूर्ण करण्यासाठी दिगंबर जैन पद्धतीने लग्न लावणारा भेटलाच नाही. 

 

त्यानंतर काही जणांनी इंटरनेटची मदत घेण्याचे ठरवले. गुगलवर तब्बल ४५ मिनिटे सर्च करून जैन समाजातील विवाहविधीची माहिती मिळाली. यानंतर वैदिक रीतीरिवाजानुसार मंत्रासह विधी पार पाडला.  सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील पिपरई येथे जैन धर्मशाळेतील हा प्रसंग आहे. सजल- आयुषी यांचा विवाह होता. सर्व कार्यक्रमानंतर जेव्हा फेरे घेण्याची वेळ आली तेव्हा पुरोहित नसल्याने वर आणि वधू पक्षांकडील मंडळी काळजीत पडली. तेव्हा राहुल जैन नावाच्या तरुणाने नेटवर जैन विधीतून विवाहसंस्कार सर्च केले. सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केल्यानंतर सर्व विधी सापडले. एका नातेवाइकांने विवाहाचे सर्व विधी पार पाडले.

बातम्या आणखी आहेत...