आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाने घ्यावी आई-वडिलांची काळजी म्हणून मुलीच्या सासूला दागिने, स्कूटी, फ्रिज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - मुलीच्या विवाहानंतर ती सासरी जाताना आई-वडील तिला आपल्या कुवतीनुसार भेटवस्तू देतात. याचे कारण म्हणजे तिला सासुरवाडीत कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये. मात्र, गुजरातच्या राजकोटमध्ये ही परंपराच बदलून टाकली जाणार आहे. येथील काही कुटुंबे आता मुलीस नव्हे, तिच्या सासूलाच भेटवस्तू देतील. जेणेकरून मुलगी-जावई हे आई-वडिलांची अधिक काळजी घेतील. म्हातारपणी जावयाच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. एवढेच नव्हे, या भेटवस्तूत सासूला स्कूटी दिली जाईल. दहा कुटुंबे मिळून ही परंपरा सुरू करत आहेत. ७ मे रोजी राजकोटच्या गोंडल रोडवर होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात असे
पाच विवाह होत आहेत.
 
एका स्थानिक संस्थेने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. आयोजक विजयसिंह जडेजा म्हणतात, आजकाल एकत्र कुटुंबे फार लवकर विभक्त होत आहेत. मुले लग्नानंतर काही दिवसांतच आई-वडिलांना सोडून पत्नीसोबत वेगळे राहू लागतात. या स्थितीत आई-वडिलांची काळजी घेणारे कोणीच नसते. मुलगा आणि सून दोघेही काळजी घेत नाहीत म्हणून अनेक आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जाते. उतारवयात मग हे लोक अत्यंत एकाकी जीवन जगतात. म्हणूनच लग्नामध्ये मुलीस भेटवस्तू देण्याऐवजी तिच्या सासूलाच या वस्तू द्यायच्या, असे आम्ही ठरवले. राजेंद्र गोपालभाईचा विवाह नीलमशी होत आहे. राजेंद्रची आई लीलाबहन यांच्या मते, आयोजक या माध्यमातून आई-वडिलांचे मानवी जीवनात असलेले महत्त्व सांगू पाहत आहेत. हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. माझ्यासाठी तर मुलगी काय किंवा सून काय, दोघीही सारख्याच. 
 
सासूला देणार या वस्तू
आयोजकांच्या वतीने नवदांपत्यास विवाहानंतर स्कूटी, फ्रिज, कपाट, काही फर्निचर, कुलर, पंखा, तुळशी वृंदावन असे साहित्य दिले जाईल. याशिवाय दागिन्यांचा सेट आणि चांदीची नाणीही मुलीच्या सासूला दिली जातील.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...