आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यापा-यांवर एनआयएने टाकले छापे; फुटीरवादी कारवायांना पैसा पुरवल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर-राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी काश्मीर आणि दिल्लीतील १६ व्यापाऱ्यांवर छापे टाकले. हे व्यापारी हवाला व्यवहार करत असल्याचा आणि दहशतवादी तसेच फुटीरवादी कारवायांना पैसा पुरवत असल्याचा संशय आहे.  
 
एनआयएच्या पथकांनी बुधवारी सकाळी श्रीनगर आणि उत्तर काश्मीरमधील विविध व्यापाऱ्यांवर छापे टाकले. दिल्लीतील पाच व्यापाऱ्यांवरही छापे टाकण्यात आले. एनआयएने मंगळवारी एका छायाचित्रकारासह दोघांना अटक केली होती. हा छायाचित्रकार दगडफेक करण्यात तसेच सोशल मीडियामार्फत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात सहभागी होता, असा आरोप आहे. दहशतवाद्यांना निधी दिल्याप्रकरणी एनआयएने ३० मे रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यात पाकिस्तानमधील जमात-उद-दावा या संघटनेचा नेता हाफीज सईद हा प्रमुख आरोपी आहे. एनआयएने या प्रकरणात सात जणांना अटक केली अाहे. त्यांच्याविरोधात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना आणि घातपाती कारवायांना निधी पुरवत असल्याचा तसेच हवाला व्यवहाराद्वारे त्यासाठी निधी उभा करणे, गोळा करणे आणि मिळवणे असाही आरोप आहे.
बातम्या आणखी आहेत...