आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश यांच्या दिशेने जोडा फेकणारा अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर गुरुवारी एका सभेत जोडा भिरकावण्यात आला. यात ते बालंबाल बचावले. या घटनेनंतर कार्यक्रमात गोंधळ उडाला. तिथे उपस्थित स्थानिक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तरुणास सभास्थळापासून बाजूला नेले. पकडलेल्या तरुणास नितीश यांनी दारू पितो का, अशी विचारणा केली.

बख्तियारपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित कार्यक्रमात नितीश दारुबंदीबाबत भाषण देत होते. यादरम्यान त्यांच्या दिशेने जोडा भिरकावण्यात आला. तेव्हा त्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन केले.