आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज फक्त ८० फूट दूर, १०० घरांत अंधार, सरकारी योजनांची अशीही अंमलबजावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकानेर (राजस्थान) - बिकानेरच्या पुगलपासून ४० किमी दूर एक गाव. त्याचे नाव पार्वती तलाई. एक रस्ता गावाची दोन भागांत विभागणी करतो. गावात दोनच मोहल्ले आहेत. दोघांतील अंतर असेल सुमारे ५० फूट. पण दोघांच्या राहणीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. विजेमुळे हा फरक झाला आहे. एकीकडील भागातील घरांत टीव्ही, फ्रीज, कूलर आहे, तर दुसरीकडे मुले अजूनही चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करत आहेत.
गावाच्या उत्तर दिशेला राजपूत मोहल्ला आहे, तर दक्षिणेला चारणांचा. राजपुतांच्या मोहल्ल्यात विजेचे सर्वेक्षण कधी झाले, केव्हा खांब लागले आणि विजेच्या तार केव्हा आल्या याचा पत्ताही चारणांना लागला नाही.

सुमारे १०० घरे असणाऱ्या चारणांच्या मोहल्ल्यात राहणारे आइदान आसियां (४०) म्हणतात की, सर्वेक्षण कधी झाले याचा पत्ता आम्हाला लागलाच नाही. जेव्हा राजपूत मोहल्ल्यात वीज आल्यावर आम्हीही मागणी केली, पण अधिकाऱ्यांनी नकार दिला. विजेचा खांब फक्त ८० फूट दूर आहे. पण चिमणीच्या धुरामुळे आमच्या घराचे छत काळे होत आहे. आमची मुले टीव्हीसाठी हट्ट करतात, पण त्यांना काय समजवावे? सर्व ताकदीचा खेळ आहे. राजपुतांच्या मोहल्ल्यात चारण मोहल्ल्याच्या लोकांचे येणे-जाणे फक्त लग्नकार्य आणि मृत्यू झाल्यासच होते. दळण आणण्यासारख्या कामासाठी आम्ही इतर गावांतच जातो.

वीज मंडळ, खाजूवालाचे एईएन विजयसिंह राठोड यांना विजेच्या भेदभावाबद्दल कारण विचारले असता ते म्हणाले- दोन वर्षांपूर्वी गावात बीएडीपी योजनेनुसार सर्वेक्षण झाले होते. काही कुटुंबीय वंचित झाले. आता त्यांना ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय सर्वांना वीज योजने’अंतर्गत कनेक्शन देऊ. तिकडे वीज आल्याने राजपूत मोहल्ल्याचा कायापालट झाला आहे. दीडशेपेक्षा जास्त घरे असलेल्या या मोहल्ल्यात सगळीकडे वीज आहे. आधी जेथे विजेची उपकरणे नव्हती तेथे आता दुरुस्तीची दुकानेही सुरू होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...