आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी तयारी, पण मी हजर राहू शकतो की नाही हे कोर्टाने ठरवावे : काटजू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्केंडेय काटजू यांनी सर्वाेच्च न्यायालयात हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, घटनेच्या कलम १२४(७) मला सर्वाेच्च न्यायालयात हजर राहता येते का हे काेर्टाने ठरवावे असा प्रतिप्रश्न त्यांनी न्यायालयाला केला अाहे.

काटजू यांनी फेसबुक ब्लॉगवर सौम्या अत्याचार प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर टीका करत काही त्रुटींचा उल्लेख केला होता. यावर न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरीत्या हजर राहून स्पष्टीकरण देण्याची नोटीस जारी केली होती. मला खुल्या न्यायालयात हजर राहून या मुद्द्यावर चर्चा करायला आवडेल. मात्र, निवृत्त न्यायमूर्ती या नात्याने कलम १२४(७) अंतर्गत हजर राहणे निषिद्ध तर नाही ना, याचा न्यायमूर्तींनी विचार करावा, असे त्यांनी म्हटले अाहे.
बीफ टिप्पणीवर काटजू यांना नोटीस
अलाहाबाद । येथील एका न्यायालयाने मार्कंडेय काटजू यांना नोटीस जारी करत गोमांस खाण्यावरून ब्लॉगवर केलेल्या टिप्पणीवर १८ नोंव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. अतिरित्र सत्र न्यायाधीश शुची श्रीवास्तव यांनी राकेश पांडे यांच्या फेरविचार याचिकेवर ही नोटीस जारी केली. काटजू यांनी हिंदूंच्या श्रद्धेवर हल्ल्याचा आरोप याचिकेतून केला.
बातम्या आणखी आहेत...